Cipla Valuation : सिप्ला कंपनीच्या मूल्यांकनाचा पेच, कंपनी विक्रीवर अध्यक्ष म्हणाले...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Cipla Valuation : सिप्ला कंपनीच्या मूल्यांकनाचा पेच, कंपनी विक्रीवर अध्यक्ष म्हणाले...

Cipla Valuation : सिप्ला कंपनीच्या मूल्यांकनाचा पेच, कंपनी विक्रीवर अध्यक्ष म्हणाले...

Sep 15, 2023 09:45 AM IST

Cipla Valuation : सिप्ला कंपनीची स्थापना १९३५ मध्ये बिगर कार्यकारी अध्यक्ष युसूफ यांच्या वडिलांनी मुंबईत केली होती. जेनेरिक एचआयव्ही औषधांच्या विक्रीमुळे कंपनीने जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवली होती.

Cipla HT
Cipla HT

Cipla Valuation : देशातील दिग्गज फार्मा कंपनी सिप्ला लिमिटेडचे संस्थापक कौटुंबिक स्टेक विक्री योजना अटकू शकते. वास्तविक कंपनीचे संभावित खरेदीदार १.०९ ट्रिलियन रुपये मूल्यांकनावर ठाम आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, काही फार्मा कंपन्या आणि खाजगी इक्विटी फर्म्ससहित अन्य संभावित खरेदीदारांसोबतची चर्चाही तळ्यात मळ्यात आहे. सिप्लाच्या कौटुबिक संस्थापका प्रति शेअर्स १३५० रुपयांची मागणी करत आहेत. ही किंमत शेअर्सच्या सध्याच्या किंमतींपेक्षा प्रिमियमवर आहे. बीएसईवर गुरूवारी शेअर्सची किंमत १२३४.१५ रुपये होती.

कौटुंबिक हिस्सेदारी

सिप्लाचे संस्थापक हामिद कुटूंबाचा कंपनीमध्ये ३३ टक्के हिस्सा आहे. गेल्या २७ जुलैला हामिद कुटुंबाद्वारे आपला हिस्सा विक्री करण्याच्या संभावनेमुळे सिप्ला कंपनीचे शेअर्स तब्बल १६ टक्के वाढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटूंबातील संस्थापक सदस्य कंपनीतील आपला हिस्सा विकू शकतात.

दरम्यान, या करारावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. सिप्लाचे संस्थापक अद्यापही आपली मागणी कमी करू शकतात किंवा कंपनीची विक्री थांबवू शकतात. दरम्यान, कंपनीच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात अद्याप कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

कंपनीबद्दल

सिप्लाची स्थापना १९३५ मध्ये बिगर कार्यकारी अध्यक्ष युसुफ के हामिदच्या वडिलांनी मुंबईत केली होती. आफ्रिकेमध्ये स्वस्तात जेनेरिक एचआयव्ही औषधांची विक्रीबाबत मोठे पाऊल उचलून जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवली होती. प्लाची कार्यकारी उपाध्यक्ष समीना हामिद, फाऊंडर फॅमिलीची तिसऱी पिढी कार्यरत आहे. त्यांचे वडिल एम के हामिद बिगर कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. वाय के हामिद त्यांचे काका आहेत.

Whats_app_banner