Gold Silver rates 6 november : आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगलीच वाढ दिसत आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये आज प्रति तोळा १५० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेटसाठी सोन्याची किंमत अंदाजे ४९७५० रुपये आहे. काल त्या किंमतीत अंदाजे ४९६०० रुपये आहेत. २४ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमती अंदाजे ५४,२६० रुपये प्रति तोळा आहेत. काल त्या अंदाजे ५४१०० रुपये प्रति तोळा होत्या.
चांदीच्या किंमतींमध्ये कालच्या तुलनेत १३०० रुपये वाढ झाली आहे. चांदीच्या किंमती आज ६६५०० रुपये प्रति किलोंच्या घरात आहेत. काल त्यात अंदाजे ६५२०० रुपये आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. आज, अमेरिकेमध्ये सोने ३.२५ डॉलरने घसरून $१,७९५.६० डाॅलर्स प्रति औंस दराने व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, चांदी ०.२१ डॉलरने घसरून २३.०३ डाॅलर्स प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहेत.
देशाच्या विविध शहरांतील सोने चांदीचे दर पुढीलप्रमाणे -
शहर | सोने (२२ कॅरेट रु. प्रति तोळा) | सोने (२४ कॅरेट रुपये प्रति तोळा) | चांदी (रु.प्रति किलो) |
चेन्नई | ५०४५० | ५५०४० | ७२५०० |
मुंबई | ४९६०० | ५४११० | ६६५०० |
नवी दिल्ली | ४९७५० | ५४२६० | ७२५०० |
कोलकाता | ४९६०० | ५४११० | ७२५०० |
बंगळूरु | ४९६५० | ५४११० | ७२५०० |
हैदराबाद | ४९६०० | ५४११० | ६६५०० |
केरळ | ४९६०० | ५४११० | ६६५०० |
पुणे | ४९६०० | ५४११० | ६६५०० |
बडोदा | ४९६५० | ५४११० | ६६५०० |