मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : आजच खरेदी करा ! उच्चांकी पातळीवरून सोने चांदी दरात घट

Gold Silver price today : आजच खरेदी करा ! उच्चांकी पातळीवरून सोने चांदी दरात घट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 09, 2023 09:46 AM IST

Gold Silver price today : आज ९ जानेवारी २०२३ रोजी सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकानंतर स्थिरावल्या आहेत. 2023 मध्ये पहिल्यांदाच सोन्या-चांदीच्या किमती स्थिरावल्या होत्या. तुम्ही दागिने घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजच्या किंमती -

Gold SIlver price HT
Gold SIlver price HT

Gold Silver price today : सोन्या-चांदीच्या दरात दररोज काही ना काही बदल होत आहेत. सर्वसामान्यांनाही सोन्याच्या दरात कपात होण्याची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आज सोन्या-चांदीचे भाव स्थिर आहेत. या वर्षात पहिल्यांदाच दोन्ही धातूंच्या किमती स्थिरावल्या आहेत.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोने स्थिर झाले (Gold Price Today)

- २२ कॅरेट सोने १० ग्रॅम - ५०२२३ रुपये

- 24 कॅरेट शुद्ध सोने १० ग्रॅम - ५०,४८४ रुपये

आज चांदीची किंमत (Silver Price Today)

चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाले तर काल त्यात वाढ झाली होती. मात्र आज भाव स्थिर आहेत. आज ९ जानेवारी २०२३ रोजी चांदीचा भाव असा असेल.

- आज १ किलो चांदीचा भाव ७४४०० रुपये आहे

दागिन्यांची किंमत बाजारभावापेक्षा जास्त का ?

लोकांना नेहमी वाटतं की आज बाजारभाव इतका आहे, पण ज्वेलर्स आपल्यापेक्षा जास्त पैसे घेतोय. म्हणूनच तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की बाजारातील किंमत शुद्ध धातूच्या बारची आहे. या दागिन्यांना रेट केलेले नाही. त्यामुळे कोणताही दुकानदार दागिन्यांच्या वजनावर मेकिंग आणि सर्व्हिस चार्जेस आकारतो, त्यामुळे तुमचे दागिने बाजारभावापेक्षा वर पोहोचतात.

२२ आणि २४ कॅरेट सोन्यामध्ये फरक

२४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध आणि २२ कॅरेट सुमारे ९१ टक्के शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग