Jio: सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी जिओ युजर्ससाठी उपलब्ध आहे 'हा' सर्वात स्वस्त प्लान!-cheapest plan available for jio users to keep their sim card active ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio: सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी जिओ युजर्ससाठी उपलब्ध आहे 'हा' सर्वात स्वस्त प्लान!

Jio: सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी जिओ युजर्ससाठी उपलब्ध आहे 'हा' सर्वात स्वस्त प्लान!

Sep 28, 2024 10:01 PM IST

Jio Cheapest Plan: सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी जिओने आपल्या युजर्ससाठी सर्वात स्वस्त प्लान लॉन्च केला आहे.

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लान
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लान

Jio Recharge: जवळपास सर्व नवीन स्मार्टफोन्स आता ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसह येतात आणि युजर्सकडे दोन नंबर असतात. अशावेळी कोणत्याही एका नंबरवरून जास्त कॉलिंग करून मोबाइल डेटाचा वापर केला जातो. जर तुमच्याकडे दुसरा जिओ नंबर असेल आणि तो अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठीच तुम्हाला रिचार्ज करायचा असेल तर आम्ही तुमचे काम सोपे करणार आहोत. तुम्ही कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनने रिचार्ज करू शकता, जो नंबर अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी निवडणे आवश्यक आहे.

आम्ही बोलत आहोत रिलायन्स जिओच्या १८९ रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल, जो सध्या कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड टॅरिफ प्लान बनला आहे. या प्लानने रिचार्ज केल्यावर तुमचा नंबर अ‍ॅक्टिव्ह राहील. मात्र, याची वैधता फक्त २८ दिवसांची आहे. म्हणजेच दर २८ दिवसांनी तुम्हाला हा प्लान रिचार्ज करावा लागेल. याशिवाय, पर्याय म्हणून इतर व्हॅल्यू प्लॅन्सही निवडता येतील, जे डेली डेटा देत नाहीत पण दीर्घ वैधता नक्कीच मिळते.

जिओचे स्वस्त प्रीपेड टॅरिफ प्लान

रिलायन्स जिओ युजर्संना १८९ रुपयांच्या प्लॅनसोबत रिचार्ज केल्यास २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगव्यतिरिक्त २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय संपूर्ण वैधतेसाठी ३०० एसएमएसही मिळतात. या प्लानसोबत रिचार्ज केल्यास जिओसिनेम, जिओक्लाऊड आणि जिओ टीव्ही अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही दिला जात आहे. प्लानमध्ये मिळणारा एकूण २ जीबी डेटा संपल्यानंतर डेटा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो.

जिओचे इतर प्लान

कंपनी ४७९ रुपये आणि १ हजार ८९९ रुपयांचे व्हॅल्यू प्लान देखील ऑफर करत आहे आणि ते अनुक्रमे ८४ दिवस आणि ३३६ दिवसांची वैधता देतात. या प्लानमध्ये संपूर्ण वैधतेसाठी ६ जीबी आणि २४ जीबी डेटा दिला जात आहे. त्याचप्रमाणे १००० एसएमएस आणि ३६०० एसएमएस दिले जात आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड अ‍ॅप्सचा ही अ‍ॅक्सेस मिळतो. मात्र, कोणत्याही व्हॅल्यू प्लानमध्ये अनलिमिटेड 5G चा लाभ दिला जात नाही.

जिओचा ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान

जिओच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ७० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस आणि अनलिमिटेड 5जी डेटा मिळतो.

Whats_app_banner
विभाग