मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OpenAI : अ‍ॅपलच्या सिंहासनाला पहिला हादरा! चॅटजीपीटी बनवणारी कंपनी आणतेय एआय आधारित स्मार्टफोन

OpenAI : अ‍ॅपलच्या सिंहासनाला पहिला हादरा! चॅटजीपीटी बनवणारी कंपनी आणतेय एआय आधारित स्मार्टफोन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2024 04:01 PM IST

OpenAI Smartphone News : चॅटजीपीटी बनवणारी कंपनी एआय लवकरच त्यांचा एआय फीचर्स असलेला स्मार्टफोन बाजारात उतरवत आहे.

OpenAI
OpenAI

Upcoming AI Smartphones: एआय टूल्स बर्याच काळापासून चर्चेत आहेत. परंतु, बहुतेक इंटरनेट वापरकर्त्यांना चॅटजीपीटी (ChatGPT) नंतरच त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. आता ओपनएआय, चॅटजीपीटी बनवणारी कंपनी नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. यामुळे जगप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी अ‍ॅपलचं टेन्शन वाढलं आहे. कारण, चॅट जीपीटीचा आगामी स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक दिग्गज कंपन्यांना टक्कर देऊ शकतो.

2007 मध्ये, ऍपलने आपल्या पहिल्या फोनसह आधुनिक स्मार्टफोन तयार केला, ज्यात कीपॅड नसून तो पूर्णपणे टच स्क्रीनवर काम करतो. ओपनएआयचा स्मार्टफोनदेखील अशीच क्रांती घडवून आणेल आणि अ‍ॅपलला कडवी झुंज देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओपनएआयचा आगामी स्मार्टफोन पूर्णपणे एआय वर आधारित असू शकतो आणि वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीच्या आधारे तो स्वतःहून निर्णय घेऊ शकेल.नुकतेच ऍपलच्या आयफोन आणि ऍपल वॉच टीमशी संबंधित असलेल्या तांग टॅनने कंपनी सोडली आहे. आता तो जॉन इव्हच्या कंपनी लव्ह फ्रॉममध्ये सामील झाला आहे. ही कंपनी एका खास एआय उपकरणावर काम करत आहे.

iPhone 16: आयफोन १६ प्रोबाबत नवी माहिती लीक, 'या' दोन रंगात बाजारात दाखल होण्याची शक्यता

अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या उपकरणांमध्ये एआय आधारित फीचर्स देत आहेत. परंतु आतापर्यंत एआयवर पूर्णपणे काम करणारा एकही स्मार्टफोन बाजारात आलेला नाही. साउथ कोरियन टेक ट्रेंड सॅमसंगच्या गॅलेक्सी एस २४ सीरीजमध्ये अनेक एआय फीचर्स आहेत. हे स्पष्ट आहे की एआय आता स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत आहे.

WhatsApp channel