लग्नांची लगबग सुरू असताना सोन्याच्या दरात वाढ, तुमच्या शहरात किती आहे आजचा भाव?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  लग्नांची लगबग सुरू असताना सोन्याच्या दरात वाढ, तुमच्या शहरात किती आहे आजचा भाव?

लग्नांची लगबग सुरू असताना सोन्याच्या दरात वाढ, तुमच्या शहरात किती आहे आजचा भाव?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 19, 2024 11:51 AM IST

Gold Silver Price news in marathi : लगीनसराईची लगबग सुरू असताना सोन्याच्या दरात आज किंचित वाढ झाली आहे. तर, चांदीचा भाव स्थिर आहे.

आज सोन्या-चांदीच्या दरात बदल, महाग की स्वस्त, पाहा ताजे दर
आज सोन्या-चांदीच्या दरात बदल, महाग की स्वस्त, पाहा ताजे दर

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या काळात मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात येत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १२८ रुपयांनी वाढला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १.५८ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या महिन्यात त्यात ४.९६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीचा सध्याचा भाव ९२,५०० रुपये प्रति किलो आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

लाइव्ह मिंटनुसार, मुंबईत आज सोन्याचा भाव तोळ्यामागे ७६,३४७ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी येथे सोन्याचा भाव ७५,६७७ रुपये आणि मागील आठवड्यात ७६८७७ रुपये होता. आज मुंबईत चांदीचा भाव ९१,८०० रुपये प्रति किलो आहे. सोमवारी चांदीचा भाव ९१९०० रुपये प्रति किलो होता.

दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,४९३ रुपये आहे. सोमवारी सोन्याचा भाव ७५,८२३ रुपये आणि मागील आठवड्यात ७७,९२३ रुपये होता. दिल्लीत आज चांदीचा भाव ९२,५०० रुपये प्रति किलो आहे. सोमवारी तो ९२,६०० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. गेल्या आठवड्यात तो ९४,१०० रुपये किलो होता.

चेन्नईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,७६० रुपये आहे. तर सोमवारी तो ७५,६७१ रुपये आणि गेल्या आठवड्यात ७६,८७१ रुपये होता. चेन्नईत आज चांदीचा भाव १,०१,६०० रुपये प्रति किलो आहे. सोमवारी तो १,०१,७०० रुपये प्रति किलो आणि गेल्या आठवड्यात १,०३,७०० रुपये होता.

कोलकात्यात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,३४५ रुपये आहे. तर, सोमवारी त्याची किंमत ७५,६७५ रुपये आणि मागील आठवड्यात ७६,८७५ रुपये होती. आज चांदीचा भाव ९३,३०० रुपये प्रति किलो आहे. १८ तारखेला चांदीचा दर ९३,४०० रुपये प्रति किलो होता.

गेल्या आठवड्यातील जोरदार तेजीनंतर नफावसुलीमुळे अमेरिकी डॉलर घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतिक स्तरावर सोन्याची किंमत डॉलरमध्ये निश्चित केली जाते, त्यामुळे अमेरिकन चलन कमकुवत झाल्यास इतर चलनांचा वापर करणाऱ्या खरेदीदारांना सराफा अधिक परवडतो.

Whats_app_banner