मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EMC Jobs : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशात निर्माण होणार १८ हजार नव्या नोकऱ्या

EMC Jobs : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशात निर्माण होणार १८ हजार नव्या नोकऱ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 28, 2023 12:13 PM IST

EMC create 18000 Jobs : केंद्र सरकारने कर्नाटकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्सच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. आणखी ३ क्लस्टर्स स्थापन करण्याची योजना आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होतील.

Jobs HT
Jobs HT

EMC create 18000 Jobs : केंद्र सरकारने हुबळी-धारवाड, कर्नाटक येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्सच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे या मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये १८००० नोकऱ्या निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी सरकार १८० कोटी रुपये खर्च करणार आहे. तर ९ कंपन्या आणि स्टार्टअप्सनी ३४० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शनिवारी बेंगळुरूमध्ये १८० कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) स्थापन करण्यास मान्यता दिल्याची घोषणा केली. ईएमसी २.० योजनेंतर्गत कर्नाटकातील धारवाडमधील कोतूर-बलूर औद्योगिक परिसरात उभारण्यात येणार्‍या क्लस्टरमधून १८ हजाराहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टरमध्ये लवकरच १५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. स्टार्ट-अप्ससह नऊ कंपन्यांनी आधीच २५०० लोकांच्या रोजगार क्षमतेसह ३४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. नवीन गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होत आहे.

कर्नाटक हे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. कोलार (विस्ट्रॉन) आणि देवनहल्ली (फॉक्सकॉन) येथे ऍपल प्लांटसह येथे आधीच दूरसंचार हब स्थापित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच कर्नाटकातील म्हैसूर येथे प्रगत चाचणी सुविधा विकसित करण्यासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) मंजूर करण्यात आली आहे.

आणखी तीन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाणार आहेत

मॉडिफाइड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स ( ईएमसी २.०) योजना १ एप्रिल २०२० रोजी सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत १९०३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी ८८९ कोटी रुपयांची आर्थिक मदत केंद्राने मंजूर केली आहे. त्याच वेळी, १३३७ एकर क्षेत्रात तीन इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर तयार केले जातील. यामध्ये २०,९१० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट अपेक्षित आहे. अशा स्थितीत रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या