मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार होळीचं गिफ्ट! महागाई भत्त्यात ४ % वाढीची शक्यता

Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार होळीचं गिफ्ट! महागाई भत्त्यात ४ % वाढीची शक्यता

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 20, 2023 08:19 PM IST

Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) लवकरच वाढवला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार १ मार्च रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत डीए वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

Dearness allowance HT
Dearness allowance HT

Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) लवकरच वाढवला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार १ मार्च रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत डीए वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.  डीए ४ टक्के वाढण्याची शक्यता आहे. हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात आल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के होईल. याचा फायदा सुमारे ५२ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६० लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई वाढूनही त्यांचे जीवनमान राखण्यासाठी दिलेला पैसा आहे. हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो. त्याची गणना देशाच्या सध्याच्या महागाईनुसार दर ६ महिन्यांनी केली जाते. संबंधित वेतनश्रेणीवर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते. शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वेगळा असू शकतो.

महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते?

महागाई भत्ता ठरवण्यासाठी एक सूत्र दिले आहे. आता जर आपण पीएसयू (सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स) मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी महागाई भत्त्याबद्दल बोललो तर त्याची गणना पद्धत पुढीलप्रमाणे आहे. महागाई भत्ता टक्केवारी = (गेल्या ३ महिन्यांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष २००१=१००)- १२६.३३) x १००

ग्राहक किंमत निर्देशांक काय आहे?

भारतात दोन प्रकारची महागाई आहे. एक किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई. किरकोळ चलनवाढीचा दर सामान्य ग्राहकांनी भरलेल्या किमतींवर आधारित असतो. त्याला ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) असेही म्हणतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग