मराठी बातम्या  /  business  /  Ambani Metro Deal : जर्मनीची मेट्रो कंपनी रिलायन्सच्या मुठीत! तब्बल २,८५० कोटींचा करार
metro cash and carry HT
metro cash and carry HT

Ambani Metro Deal : जर्मनीची मेट्रो कंपनी रिलायन्सच्या मुठीत! तब्बल २,८५० कोटींचा करार

17 March 2023, 10:38 ISTKulkarni Rutuja Sudeep

Ambani Metro Deal : मुकेश अंबानींच्या साम्राज्य विस्तारात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. जर्मन कंपनी मेट्रो एजीचे अधिग्रहण केले आहे.

Ambani Metro Deal : मुकेश अंबानींच्या साम्राज्य विस्तारात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. जर्मन कंपनी मेट्रो एजीचे अधिग्रहण केले आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेलने जर्मनीची कंपनी मेट्रो एजी (Metro AG) च्या व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. याआधी रिलायन्सने कॅम्पा कोलाची मालकी मिळवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

डिसेंबर २०२२ मध्ये रिलायन्स रिटेल आणि मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया यांच्यात करार झाला. हा करार २,८५० कोटी रुपयांचा असून यात १०० टक्के मालकी हक्काचा समावेश आहे. मेट्रो ही एक जर्मन कंपनी आहे. या कंपनीने २००३ मध्ये भारतात आपले व्यवसाय सुरू केला होता. कॅश-अँड-कॅरी व्यवसायाचे स्वरूप त्यांनी सादर केले होते.

या करारानुसार, रिलायन्स रिटेलला दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, अमृतसर, अहमदाबाद, सुरत, इंदूर, मेरठ, लखनऊ, नाशिक, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, तुमाकुरू, गाझियाबाद आणि हुबळी येथे प्राइम मेट्रो स्थानांवरील स्टोअर्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. कराराचा भाग म्हणून, रिलायन्स रिटेलला नोंदणीकृत किराणा स्टोअर्स, संस्थात्मक ग्राहक आणि मजबूत पुरवठादार नेटवर्कचा मोठा आधारदेखील मिळेल. या करारामुळे देशातील छोट्या उद्योगांच्या वाढीलाही प्रोत्साहन मिळेल असे सुतोवाच रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका ईशा अंबानी यांनी सांगितले.

विभाग