Infosys : इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infosys : इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा

Infosys : इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा

Jan 28, 2025 09:35 AM IST

Atrocity against Infosys Co-founder : इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्यासह १८ जणांवरअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्फोसिसच्या सहसंस्थापकासह इतर १६ जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा
इन्फोसिसच्या सहसंस्थापकासह इतर १६ जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा

Infosys News : देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिस गोपालकृष्णन, माजी IISc संचालक बलराम आणि इतर १६ जणांच्या विरुद्ध SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं उद्योगजगतात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

७१ व्या शहर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या (सीसीएच) निर्देशानुसार सदाशिव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आदिवासी बोवी समाजाचे दुर्गाप्पा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधील सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी सदस्य होते.

२०१४ मध्ये आपल्याला हनी ट्रॅपच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि नंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे.

कोण आहेत ख्रिस गोपालकृष्णन?

क्रिस गोपालकृष्णन हे इन्फोसिसच्या सह-संस्थापकांपैकी एक आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत ते इन्फोसिसचे उपाध्यक्ष होते. २००७ ते २०११ पर्यंत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केलं आहे.

नागोपालकृष्ण यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांची २०१३-१४ साठी भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि जानेवारी २०१४ मध्ये दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या सह-अध्यक्षांपैकी एक म्हणून काम केले. जानेवारी २०११ मध्ये भारत सरकारने गोपालकृष्णन यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलं.

IIT मधून भौतिकशास्त्र आणि संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी

क्रिस गोपालकृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास येथून भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअर्स (INAE) चे फेलो आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (IETE) संस्थेचे मानद फेलो आहेत.

Whats_app_banner