masala cause cancer : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमुळे कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या धोका
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  masala cause cancer : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमुळे कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या धोका

masala cause cancer : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमुळे कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या धोका

Updated Apr 23, 2024 03:57 PM IST

mdh and everest masala cause cancer : मसाल्यांमध्ये कीटकनाशकांच्या बातम्यांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. हाँगकाँगमध्ये मसाल्यांचे काही नमुने तपासण्यात आले. ज्यामध्ये त्यात कीटकनाशक आढळून आले. या कीटकनाशकामुळे कर्करोग होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमुळे कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या धोका
एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमुळे कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या धोका

mdh and everest masala cause cancer : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यात कीटकनाशक असल्याच्या बातम्यांनी सर्वांनाच घाबरवले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील काही मसाल्यांमध्ये हानिकारक रसायने आढळल्याच्या बातम्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे भारतातही या मासाल्यांची तपासणी करण्यात यावी अशी चर्चा सुरू झाली आहे. काही नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. हे घातक कीटकनाशक असून ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. मात्र, अशी घातक रसायने मसाल्यांमध्ये का मिसळली जातात आणि ते आपल्या शरीराला, आरोग्याला कोणत्या प्रकारचे नुकसान पोहचवू शकतात, याची माहिती घेऊयात.

leopard in vasai fort : वसई किल्ल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर २५ दिवसांनी अडकला पिंजऱ्यात; वनविभागाला मोठे यश

मसाल्यांमध्ये आढळले कीटकनाशक

हाँगकाँगच्या सेंट्रल फूड सेफ्टी (CFS) प्राधिकरणाने स्टोअरमधून काही मसाल्यांचे नमुने गोळा केले आणि त्यांची चाचणी केली. त्यात इथिलीन ऑक्साईड आढळून आल्याचा दावा केला जात आहे. ज्या मसाल्यांची नावे समोर आली आहेत त्यात एमडीएच मद्रास करी पावडर, सांभर मिश्रित मसाला पावडर आणि करी पावडर मिश्रित मसाला आणि एव्हरेस्ट फिश करी मसाला यांचा समावेश आहे.

Parth Pawar : ऐन निवडणुकीत सरकारची अजित पवारांच्या चिरंजीवांना खास ट्रीटमेंट! पार्थ पवारांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा

कंपन्या त्यांच्या जीवाशी खेळत आहेत का?

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईड हे  कर्करोगास कारणीभूत ठरणारे रसायन मानले आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार, एखादी वस्तू खाण्यासाठी सुरक्षित असेल तेवढ्याच प्रमाणात कीटकनाशकांसह मिश्रित विकली जाऊ शकते. मात्र, काही उत्पादने लवकर खराब होऊ नयेत म्हणून कंपन्या मोठ्या प्रमाणात अशी रसायनांचा वापर करतात. इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक असून अन्नामध्ये वापरण्यास बंदी आहे. याचा उपयोग बहुतांश पिकांवर कीटकनाशक म्हणून वापरले जाते.

इथिलीन ऑक्साईड मानवी काय करते?

आरोग्य तज्ज्ञांचे मते अन्नातील इथिलीन ऑक्साईडचे थोडेसे प्रमाणदेखील मानवी आरोग्यास हानिकारक आहे. मात्र, त्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही. याचा त्रास शरीरावर हळू हळू होतो. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, इथिलीन ऑक्साईडमुळे लिम्फोमा आणि ल्युकेमियाचा धोका वाढतो. याशिवाय या रसायनामुळे पोट आणि स्तनाचा कर्करोगही होऊ शकतो. इथिलीन ऑक्साईड आपल्या डीएनएचे नुकसान करते, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

Whats_app_banner