IPO Marathi News : सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा आयपीओ दुसऱ्या दिवसापर्यंत १०८ पटीनं सब्सक्राइब झाला. हा आयपीओ शुक्रवारी, २२ नोव्हेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २६ नोव्हेंबरला बंद होईल. २१४ ते २२६ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
सी टू सी अॅडव्हान्स्ड सिस्टम्सचा आयपीओ २५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १०८ पेक्षा जास्त वेळा सब्सक्राइब झाला. सी टू सी अॅडव्हान्स्ड सिस्टम्सच्या आयपीओला क्यूआयबी गुंतवणूकदारांच्या श्रेणीत सब्सक्रिप्शन ६ पट, एनआयआय श्रेणीत १२३.२९ पट आणि आरआयआय गुंतवणूकदारांना १५८.९१ पट सबस्क्रिप्शन मिळालं. दुसऱ्या दिवशी कंपनीला २९ लाख १४ हजार ८०० समभागांच्या तुलनेत ३१ कोटी ३५ लाख ९८ हजार ४०० समभागांसाठी बोली लागली. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचा आयपीओ पहिल्या दिवशी २६.८४ पटीनं सब्सक्राइब झाला.
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आयपीओला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. कंपनीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये २४५ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. म्हणजेच कंपनीचे शेअर्स ४७१ रुपयांवर लिस्ट झाले. म्हणजेच लिस्टिंगवर कंपनीचे शेअर्स जवळपास १०९ टक्के नफा कमावू शकतात. हा शेअर २९ नोव्हेंबरला लिस्ट होण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट होतील.
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी चंद्रा म्हणाले, 'हा निधी आमचे क्रियाशील भांडवल अधिक मजबूत करेल. आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला आर्थिक बळ मिळेल. आमचा ग्राहक बेस आणखी वाढवेल आणि आमच्या वाढत्या ग्राहक बेसला बळ देईल. सी २ सी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स संरक्षण, होमलॅण्ड सिक्युरिटी आणि एअरोस्पेस क्षेत्रांसाठी गुंतागुंतीच्या प्रणालींच्या विकासात आघाडीवर आहे.