
Byjus in trouble : बायजू या एडटेक कंपनीपुढील अडचणींचा पाढा संपता संपत नाहीये. कंपनीने आधी कर्मचारी कपात केल्यानंतर आता आॅफिसही खाली केले आहे. अनेक कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कमही दिलेली नाही.
रिपोर्टनुसार, बायजूने आपल्या काही कर्मचाऱ्यांना बंगळूरूस्थित आॅफिस खाली करण्यास सांगितले आहे. तत्पुर्वी कंपनीने जूनपासून काही कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसेही दिलेले नाहीत.
बायजूच्या बंगळूरुस्थित कल्याणी टेक पार्कमध्ये आॅफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे आदेश दिले आहेत. २३ जुलैपासून एकतर घरातून अथवा इतर सेंटरमध्ये जाऊन काम करा असे आदेश कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. कंपनीचे हे आॅफिस ५.५८ लाख चौफुट होते. रिपोर्टनुसार, कंपनीने प्रेस्टिज टेक पार्कमधील ९ व्या मजली इमारीतीतील २ फ्लोअर्स खाली केले आहेत.
कंपनीजवळ देशभरातील अंदाजे ३० लाख चौ फुट आँफिस आहे. आँफिस स्पेस वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय हा बिझनेसची प्राथमिकता आणि वर्किंग पाॅलिसीच्या आधारावर घेतला जातो.
जून महिन्यात बायजूने फक्त ७३८ कर्मचाऱ्यांना पीएफ दिला आहे. तर गेल्या महिन्यात कंपनीने २५ हजार कर्मचाऱ्यांना पीएफ दिला आहे. कंपनीने २६ जूनला तब्बल २४८१८ कर्मचाऱ्यांना पीएफ दिला आहे. तत्पुर्वी एप्रिल आणि मे मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला पीएफ दिलेला नाही.
कंपनी आपल्या खर्चाला नियंत्रित करु इच्छिते. त्यामुळेच पहिल्यांदा कर्मचाऱी कपात आणि आता आॅफिसेस रिकामे केले जात आहेत. ले आॅफ ट्रॅकिंग कंपनी ले आॅफ फायच्या अहवालानुसार गेल्या ९ महिन्यात कंपनीने ५ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
संबंधित बातम्या
