BYD Seal EV Launched: बीवायडी इंडियाने अखेर सीलइलेक्ट्रिक वाहन भारतीय बाजारात लाँच केले आहे. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ही इलेक्ट्रिक सेडान भारतात लाँच करण्यात आली होती, पण लाँचिंगला उशीर झाला. आता अखेरीस बीवायडी दोन बॅटरी पॅक पर्यायांसह त्याची विक्री करणार आहे. ६१.४४ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक केवळ डायनॅमिक रेंज व्हेरिएंटसह दिला जाईल आणि त्यानंतर ८२.५६किलोवॅट बॅटरी पॅक आहे, जो प्रीमियम रेंज आणि परफॉर्मन्स या दोन व्हेरियंटमध्ये सादर केला जाईल. ही कार सव्वा लाख रुपयांचे टोकन देऊन बूक करता येऊ शकते.
डायनॅमिक रेंज आणि प्रीमियम रेंज व्हेरियंटमध्ये रियर व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेन तर परफॉर्मन्स व्हेरियंटमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेन देण्यात येणार आहे. हे तिन्ही व्हेरियंट वेगवेगळ्या पातळीचे पॉवर आउटपुट तयार करतात. त्यांची किंमत अनुक्रमे ४१ लाख, ४५.५५ लाख आणि ५३ लाख रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
डायनॅमिक रेंज २०१ बीएचपी पॉवर आणि ३१० एनएम जनरेट करते, तर प्रीमियम रेंज ३०८ बीएचपी पॉवर आणि ३६० एनएम जनरेट करते. त्यानंतर पेफॉर्मन्स व्हेरियंट आहे. दोन्ही मोटर्सचे एकत्रित पॉवर आउटपुट ५२२ बीएचपी पॉवर आणि ६७० एनएम जनरेट करते.
डायनॅमिक रेंजची रेंज ५१० किमी असून त्याचा वेग ०-१०० किमी प्रतितास ७.५ सेकंद इतका आहे. प्रीमियम रेंज ०-१०० किमी प्रति तास वेग पकडण्यासाठी ५.९ सेकंद घेते आणि ६५० किमी ची दावा रेंज आहे. शेवटी, परफॉर्मन्स व्हेरिएंट आहे ज्याची मारक क्षमता ५८० किमी आहे आणि ती ०-१०० किमी प्रति तास वेगाने ३.८ सेकंदात वेग घेऊ शकते.
बीवायडी सील ईव्ही अरोरा व्हाईट, कॉसमॉस ब्लॅक, अटलांटिस ग्रे आणि आर्टिक ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर करेल. इलेक्ट्रिक सेडानला युरो एनसीएपी आणि एएनसीएपीच्या माध्यमातून ५ स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग मिळाले आहे.
सीलच्या इंटिरियरमध्ये थ्री-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, डिजिटल ड्रायव्हरडिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी फिरू शकते. यात पॅनोरॅमिक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, हवेशीर सीट, वायरलेस चार्जिंग आणि लेव्हल २ एडीएएस फीचर्स असतील.