BYD eMax 7 MPV : बीवायडीची नवी ईव्ही कार भारतीय बाजारपेठेत आज दाखल होणार आहे. ईमॅक्स ७ एमपीव्ही असे या कारचे नाव आहे. ही कार बीवायडी ई ६व्ही फेसलिफ्टेड आवृत्ती असून ही आधी भारतात विक्रीसाठी उपलबद्ध होती. त्यानंतर कंपनीने आता पुढची आवृत्ती भारतीय बाजारपेठेत आणली आहे. या कारमध्ये विविध वैशिष्ट्य आणि फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय ग्राहकांना हे फीचर भुरळ घालणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या गाडीची किमत किती ? फीचर काय ? या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. या गाडीचे बुकिंग हे २१ सप्टेंबर पासून सुरू झाले आहे.
या ई कारवर कंपनीने अनेक आकर्षक ऑफर देखील दिल्या आहेत. कंपनीने तब्बल ५१ हजार रुपये किमतीचे ७ केव्ही आणि ३ केव्हीचा चार्जर मोफत देणार आहे. ही ऑफर केवळ आज (दि ८) किंवा त्यापूर्वी वाहन बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच मार्च २०२५ किंवा त्यापूर्वी वाहनाची डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांना दिली जाणार आहे.
जागतिक बाजारपेठेत, बीवायडी ई मॅक्स ७ कारसह दोन बॅटरी पॅक पर्याय दिले जातात. यात ५५.४ किलो व्हॉट व्हेरियंटची रेंज ही ४२० किमी आहे. तर ७१.८ किलो व्हॉट वेरिएंट सिंगल चार्जरवर ५३० किमी पर्यंत धावू शकते. बीवायडी इंडियाने ७१.८ किलो व्हॉट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह या पूर्वी ई ६ ची विक्री केली आहे. तर ई मॅक्स ७ सोबतही हीच ऑफर कंपनी देण्याची शक्यता आहे. लहान बॅटरी पॅक देखील परवडणारा प्रकार म्हणून कंपनी पुढे आणू शकते. ७१.८ किलो व्हॉट वेरिएंटसह ड्युअल-मोटर सेटअप २०४ एचपी आणि ३१० एनएम पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.
बीबायडी ईमॅक्सचा लुक देखील आकर्षक करणार आहे. या गाडीचे डिझाईन पूर्वी पेक्षा अधिक आकर्षक करण्यात आले आहे. या कारचा पुढचा भाग पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक करण्यात आला असून या वर पातळ ग्रिल व री-स्टाइल बंपरसह स्लिम एलईडी हेडलाइट्स लावण्यात आले आहेत. तर गाडीच्या मागील बाजूस, या कारला नव्याने डिझाइन केलेले LED टेललाइट्स आणि मागील बंपर लावण्यात आले आहे.
या कारच्या केबिनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे ई मॅक्स ७ वर तीन रांगा सीट्स देण्यात आल्या आहेत. कंपनी व्हेरिएंटच्या आधारावर कॅप्टन सीट्स किंवा मागील बाजूस बेंच सीट्स ग्राहकांना देण्यात येऊ शकते. या ईव्हीला एक मोठा पॅनोरामिक सनरूफ आणि एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे.
बीबायडी ई ६ ची किंमत २९.१५ लाख (एक्स-शोरूम) आणि बीवायडी ऑटो ३ ची किंमत ३३.९९ लाख (एक्स-शोरूम) आहे. तर ई मॅक्स ७ ची किंमत ३० लाख ते ३३ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.