Stocks to buy today : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार सावरलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत मार्केट एक्सपर्ट्स सुमीत बगाडिया, वैशाली पारेख आणि गणेश डोंगरे यांनी काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे.
तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये ब्लिस जीव्हीएस फार्मा, स्ट्राईड्स फार्मा, इस्गेक हेवी इंजिनीअरिंग, टिळकनगर इंडस्ट्रीज आणि न्यूलँड लॅबोरेटरीज, गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, अॅक्लार्क्स सर्व्हिसेस लिमिटेड, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), मोरपेन लॅबोरेटरीज लिमिटेड, एचएफसीएल लिमिटेड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांचा समावेश आहे.
ब्लिस जीव्हीएस फार्मा : हा शेअर १४३.०५ रुपयांना खरेदी करून १५० रुपयांचं टार्गेट ठेवा. स्टॉपलॉस १३७ रुपये ठेवा.
स्ट्राईड्स फार्मा : स्ट्राईड्स फार्मावर १५२८.९५ रुपयांपर्यंत खरेदी करून टार्गेट १६५५ रुपये आणि स्टॉपलॉस १४८० रुपये ठेवा.
आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग : हा शेअर १४०४.७५ रुपयांवर खरेदी करून १५०० रुपयांचं टार्गेट ठेवा. स्टॉपलॉस १३५० रुपयांवर ठेवा.
टिळकनगर इंडस्ट्रीज : टिळकनगर इंडस्ट्रीज ४११.७० रुपयांना विकत घेऊन ४४४ चे टार्गेट ठेवा. स्टॉपलॉस ३९७ रुपये ठेवा.
न्यूलँड लॅबोरेटरीज : न्यूलँड लॅबोरेटरीज १६०६८.९० रुपयांना खरेदी करून टार्गेट १७३०० रुपये ठेवा. १५४०० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड : गणेश हाऊसिंगला १२४१.१ रुपयांवर बाय रेटिंग असून टार्गेट १३१३ रुपये आहे. ११९५ रुपये स्टॉपलॉस आहे.
अॅक्लार्क्स सर्व्हिसेस लिमिटेड : अॅक्लार्क्स हा शेअर ३४६२.८५ रुपयांच्या स्टॉप लॉससह ३६८० रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी ३३४० रुपयांना खरेदी करा.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स : एसबीआय लाईफ इन्शुरन्स १५४५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह आणि १४८० रुपयांच्या स्टॉप लॉससह १५०७ रुपयांना खरेदी करा.
आयटीसी लिमिटेड : आयटीसी ४७० रुपयांच्या स्टॉप लॉससह ४९० रुपयांचं टार्गेट ठेवून खरेदी करा. हा शेअर ४७७ रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) : भारत इलेक्ट्रॉनिक्सवर ३०७ रुपये बाय रेटिंग असून, ३२२ रुपयांच्या स्टॉप लॉससह ३०० रुपयांचे टार्गेट प्राइस आहे.
मोरेपेन लॅबोरेटरीज लिमिटेडचे शेअर्स : हा शेअर ७६ रुपयांना खरेदी करा. ८१ रुपयांचं टार्गेट आणि ७४.२ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा.
एचएफसीएल लिमिटेड : हा शेअर १३३ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १४० रुपये आणि स्टॉपलॉस १२८ रुपये ठेवा.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड : हा शेअर २४९० रुपयांना खरेदी करा. २६०० रुपयांचं लक्ष्य ठेवा आणि २४२० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.