Share Market News : एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, एव्हीपी महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी १०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चार शेअर्सवर सट्टेबाजी करण्याचा सल्ला दिला आहे. तर आज खरेदी करावयाच्या ब्रेकआऊट स्टॉकबाबत सुमित बागडिया यांनी पाच शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, डेटा पॅटर्न्स इंडिया, मोनार्क नेटवर्थ कॅपिटल आणि शिवालिक केमिकल्स यांचा समावेश आहे.
सुगंधा सचदेवा यांनी सुचवलेले स्वस्त शेअर्स
आंध्र शुगर्स : हा शेअर ८८.९० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ९२.६० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ८७ रुपयांवर ठेवा.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ३३.८० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ३६.२० रुपयांचं ठेवा आणि स्टॉपलॉस ३२.३० रुपये ठेवा.
महेश एम ओझा याचे इंट्राडे स्टॉक
एनएचपीसी: एनएचपीसीवर ७९.५० ते ८०.५० रुपये दरानं खरेदी करा. टार्गेट प्राइस ८३ रुपये, ८५ रुपये, ८८ रुपये आणि ९० रुपये आणि स्टॉपलॉस ७७ रुपयांपेक्षा कमी आहे.
अंशुल जैन यांची एकमेव शिफारस
फायबरवेब इंडिया : फायबरवेब इंडिया ५२ रुपयांत खरेदी करा. टार्गेट ५७ रुपये आणि स्टॉपलॉस ५० रुपये (क्लोजिंग बेसिस) ठेवा.
सुमित बागरिया यांचे ब्रेकआउट स्टॉक्स
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स : ५४.८९ रुपयांना खरेदी करा, ५९ रुपयांचं टार्गेट ठेवून ५३ रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स : हा शेअर २३१५.०५ खरेदी करा. टार्गेट प्राइस २४७७ रुपये आणि स्टॉपलॉस २२३४ रुपये ठेवा.
डेटा पॅटर्नस् इंडिया : हा शेअर २२८१.०५ रुपये ठेवा. टार्गेट प्राइस २४४१ रुपये आणि स्टॉप लॉस २२०१ रुपये ठेवा.
मोनार्क नेटवर्थ कॅपिटल : हा शेअर ४४५.६० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ४७७ रुपये आणि स्टॉपलॉस ४३० रुपये ठेवा.
शिवालिक केमिकल्सचा शेअर ७७५.१५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ८२९ रुपये आणि स्टॉपलॉस ७४८ रुपयांवर ठेवा.
संबंधित बातम्या