Stocks To Buy for Short Term : जागतिक पातळीवरील सकारात्मक मूडच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील हेवीवेट स्टॉक्समध्ये वाढ झाल्यामुळं सोमवार, २३ डिसेंबर रोजी शेअर बाजारातील पाच दिवसांची घसरण थांबली. निफ्टी १६६ अंकांनी वाढून २३७५३.४५ वर बंद झाला. मात्र अनिश्चितता लक्षात घेऊन तज्ज्ञांनी काही अल्पकालीन शेअर्स सुचवले आहेत.
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णुकांत उपाध्याय आणि चॉइस ब्रोकिंगचे मंदार भोजने यांनी अल्प मुदतीसाठी खालील ६ समभाग खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी: मागील बंद: १४०५.०३ रुपये, लक्ष्य किंमत: १५२१ ते १५७० रुपये. स्टॉपलॉस १३४० रुपये. संभाव्य वाढ - १२ टक्के
हेज : मागील बंद : ५३२.३० रुपये, स्टॉप लॉस: ४९७ रुपये, लक्ष्य किंमत: ६०५ रुपये. ६२० पर्यंत जाण्याचीही शक्यता. संभाव्य वाढं - १६.५ टक्के
KEC इंटरनॅशनल : शेवटचा बंद: १,२२०.५५ रुपये, स्टॉप लॉस: १,०७६ रुपये, लक्ष्य किंमत: १,४०० ते १,४५० रुपये, संभाव्य वाढ : १९ टक्के
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी: मागील बंद: २०२.२५ रुपये, स्टॉप लॉस: १९९ रुपये, लक्ष्य किंमत: २४५ ते २५० रुपये, संभाव्य वाढ - २४ टक्के
स्विगी: मागील बंद : ५८३.६५ रुपये, स्टॉप लॉस: ५६० रुपये, लक्ष्य किंमत : ६८० ते ७०० रुपये. संभाव्य वाढ - २० टक्के
रेमंड: मागील बंद : १७८२.४० रुपये, स्टॉप लॉस: १६०५ रुपये, लक्ष्य किंमत: १९८० ते २००० रुपये, संभाव्य वाढ : १२ टक्के
संबंधित बातम्या