Stocks to buy on 29 July 2024 : मागील आठवड्यात सलग पाच दिवस सुरू असलेली सेन्सेक्स व निफ्टीतील घसरण अखेर शुक्रवारी थांबली आणि बाजारानं पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळं हा बदल झाल्याचं मानलं जातं.
शुक्रवारी निफ्टी ४२८ अंकांनी वधारून २४,८६१ च्या नव्या शिखरावर पोहोचला. तर, सेन्सेक्स १२९२ अंकांनी वधारून ८१,३३२ वर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक ४०७ अंकांनी वधारून ५१,२९५ वर बंद झाला. ब्रॉड मार्केटमध्ये स्मॉल कॅप निर्देशांकात एक टक्का, तर मिडकॅप निर्देशांकात मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात २.१२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
या सगळ्या पार्श्वभूमीवर चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी येत्या सोमवारी खरेदी करावयाच्या समभागांबाबत काही शिफारसी केल्या आहेत. सिप्ला, विप्रो आणि कोल इंडिया या तीन समभागांची खरेदी करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.
सिप्लाचा शेअर सध्या १५७५ रुपयांवर व्यवहार करत असून आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे. हा शेअर १७२० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या भावात खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्रस १४९५ रुपयांवर स्टॉपलॉस लावायला विसरू नका.
विप्रोचा शेअर सध्या ५२४.८० रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर ५८० वर जाण्याची शक्यता आहे. ४९९ चा स्टॉप लॉस लावून यात गुंतवणूक करता येईल.
कोल इंडियाचा शेअर सध्या ५०९.८० रुपयांवर आहे. या शेअरमध्ये ब्रेकआउट अपेक्षित असून तो ५६० रुपयांवर जाऊ शकतो. ४८३ रुपयांचा स्टॉप लॉस लावून शेअर खरेदी करण्याची शिफारस सुमीत बागडिया यांनी केली आहे.