दिल्ली : पॅकेटवर नमूद केलेल्या बिस्किटांच्या संख्येपेक्षा एका बिस्किट कमी दिल्याने ITC कंपनीला ग्राहकाला तब्बल १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. कंपनीसाठी हे एक बिस्किट सर्वाधिक महाग बिस्किट ठरले आहे. कंपनीला त्याच्या १६ बिस्किटांच्या पॅकेट असलेल्या "सन फीस्ट मेरी लाइट"च्या बिस्किटपुड्यात केवळ १५ च बिस्किटं असल्याने चेन्नईतील आयटीसी लिमिटेडच्या एका ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे निर्देश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.
डिसेंबर २०२१ मध्ये, चेन्नईतील MMDA माथूरचे पी डिलेबाबू यांनी कुत्र्यांना खायला देण्यासाठी मनालीतील एका किरकोळ दुकानातून "सन फीस्ट मेरी नई बिस्किट"चे तब्बल दोन डझन पॅकेट्स विकत घेतले होते. त्यांनी पॅकेट उघडली तेव्हा त्यांना फक्त १५ बिस्किट असलेली आढळली. मात्र, त्र्यांनी रॅपरवर पहिले असता त्यात १६ नमूद केले होते. यावेळी त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी स्टोअर तसेच ITC कंपनीशी शी संपर्क साधला असता, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
प्रत्येक बिस्किटाची किंमत ७५ पैसे असल्याचे सांगून, त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आयटीसी लिमिटेड दिवसाला सुमारे ५० लाख पॅकेट्स तयार करते आणि तयार करण्यात आलेल्या पॅकेटवर असलेल्या गणनेवरून असे दिसून येते की कंपनीने दररोज लोकांकडून २९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची लूट केली जात आहे. याच्या उत्तरात फर्मने असा युक्तिवाद केला की, बिस्किट पुडा हा केवळ वजनाच्या आधारावर विकला गेला असून बिस्किटांच्या संख्येच्या आधारावर नाही. जाहिरात केलेल्या बिस्किट पॅकेटचे निव्वळ वजन ७६ ग्रॅम होते. तथापि, आयोगाने त्याची चौकशी केली असता, त्यांना आढळले की सर्व बिस्किटांची पाकिटे (१५ बिस्किटे असलेली) फक्त ७४ ग्रॅमची होती.
आयटीसीच्या वकिलांनी सांगितले की २०११ चे कायदेशीर मेट्रोलॉजी नियम प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंच्या बाबतीत जास्तीत जास्त ४.५ ग्रॅमच्या चुकीला परवानगी दिली जाते. हा वाद ग्राहक न्यायालयाने मान्य केला नाही तसेच असे मानले की अशा सूट केवळ अस्थिर स्वरूपाच्या उत्पादनांना लागू आहेत. त्यात म्हटले आहे की, हे बिस्किटांसारख्या वस्तूंना लागू नाही, ज्यांचे वजन वेळेनुसार कमी करता येत नाही.
फोरमने कंपनीचा दुसरा युक्तिवाद देखील नाकारला की उत्पादनाची विक्री ही बिस्किटयांच्या संख्येवरुन नाही तर वजनाने विकले गेले. कारण रॅपरवर बिस्किटांची संख्या लिहिलेली आहे. २९ ऑगस्टल ग्राहक न्यायालयाने आयटीसीला ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच व्यावसायिक पद्धती अवलंबल्याबद्दल पीडित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून केवळ एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले. तसेच बाजारातून १५ बिस्किटे असलेले पुडे देखील परत घेण्याचे आदेश दिले.