मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget Smartphones: जबरदस्त कॅमेरा, दमदार बॅटरी; अवघ्या ९५०० रुपयांत मिळतायेत ४ बजेट स्मार्टफोन!

Budget Smartphones: जबरदस्त कॅमेरा, दमदार बॅटरी; अवघ्या ९५०० रुपयांत मिळतायेत ४ बजेट स्मार्टफोन!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 31, 2023 08:11 AM IST

Budget Smartphones Under 9500: अवघ्या ९५०० रुपयांत ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५ हजार एमएएच बॅटरी मिळत आहे.

POCO Smartphones
POCO Smartphones

Cheap Smartphones: अवघ्या १० हजारांच्या आत जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी लाइफ असलेला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. सध्या इ- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये अनेक असे धमाकेदार स्मार्टफोन आहेत, जे ९५०० रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. या सर्व स्मार्टफोन ग्राहकांना ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.

पोको एम ६ 5G

फ्लिपकार्टवर पोको एम ६ 5G स्मार्टफोन १० हजार ४९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर मिळत आहे, ज्याद्वारे १००० रुपयांची बचत करता येणार आहे. यानंतर ग्राहकांना हा स्मार्टफोन ९ हजार ५०० रुपयांत खरेदी करता येणार आहे.

आयटेल पी ५५ 5G

आयटेल पी ५५ 5G स्मार्टफोन (४ च्या जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज) फ्लिपकार्टवर ९ हजार ९३० रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर दिली जात आहे. बँक ऑफरअंतर्गत ग्राहक १००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.

लावा ब्लेझ 5G

फोनचा ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेले मॉडेल अमेझॉनवर ९ हजार २९९ रुपयांना उपलब्ध आहे. परंतु, बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही त्यावर १००० रुपयांची सूट मिळवता येऊ शकते. त्यानंतर या स्मार्टफोनची किंमत ८ हजार २९९ रुपये इतकी असेल. फोनमध्ये ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक डेन्सिटी ७०० प्रोसेसर, ५० मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी आहे.

लावा ब्लेझ २ 5G

हा स्मार्टफोन (४ जीबी रॅम आणि ६३ जीबी स्टोरेज) अमेझॉनवर ९ हजार ९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. परंतु, ग्राहकांना बँक ऑफरचा फायदा घेऊन १००० रुपयांची बचत करता येऊ शकते.यानंतर हा स्मार्टफोन अवघ्या ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा HD Plus डिस्प्ले, MediaTek Dimensity ६०२० प्रोसेसर, ५० मेगापिक्सल रियर, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.

WhatsApp channel

विभाग