Budget 2025 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५ व २६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल हा आज त्या संसदेत सादर करणार आहेत. चालू आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना देशासमोरील आव्हानांचे विवेचन या आर्थिक पाहणी अहवालात त्या करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात सुधारणा आणि विकासाचा रोडमॅपही देण्यात आला आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा आढावा तयार केला आहे. यात पुढील आर्थिक वर्षाबाबत विविध माहिती देण्यात आली असून त्या द्वारे अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांतील आर्थिक विकासाची रूपरेषा त्यावरून ठरवली जाणार आहे.
देशाचा मंदावलेला विकासदर, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यन आणि उत्पादनांची कमी मागणी अशा महत्त्वाच्या घडामोडींचे सविस्तर मूल्यमापन या सर्वेक्षणात करण्यात आले आहे.
दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदल, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास आणि वित्तीय क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर या सर्वेक्षणात अनेकदा नवीन आणि चौकटीबाहेरील कल्पना मांडल्या जातात.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या उद्या शनिवारी नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात केली जाणार आहे. अधिवेशनाचं पहिलं सत्र हे १३ फेब्रुवारीला, तर दुसर सत्र १० मार्चरोजी सुरू होऊन ४ एप्रिलला संपणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या अर्थसंकल्प मांडणार आहे. या अर्थसंकल्पात त्या काय काय सादर करणार या कडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे. करसवलत, नवीन योजना, संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान यासाठी किती तरतूद केली जाते या कडे देखील सर्वांचे लक्ष राहणार आहे.
संबंधित बातम्या