Budget 2025 stocks : बजेटच्या आधी खरेदी करा रेल्वे कंपन्यांचे हे ३ शेअर, दणदणीत नफ्याचा तज्ञांना विश्वास
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget 2025 stocks : बजेटच्या आधी खरेदी करा रेल्वे कंपन्यांचे हे ३ शेअर, दणदणीत नफ्याचा तज्ञांना विश्वास

Budget 2025 stocks : बजेटच्या आधी खरेदी करा रेल्वे कंपन्यांचे हे ३ शेअर, दणदणीत नफ्याचा तज्ञांना विश्वास

Jan 31, 2025 10:40 AM IST

Stock To Buy Before Budget : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार तज्ञांनी तीन रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. पाहूया कोणत्या आहेत या कंपन्या?

Budget 2025 Picks : बजेटच्या आधी खरेदी करा रेल्वे कंपन्यांचे हे ३ शेअर, मोठ्या नफ्याची तज्ञांना आशा
Budget 2025 Picks : बजेटच्या आधी खरेदी करा रेल्वे कंपन्यांचे हे ३ शेअर, मोठ्या नफ्याची तज्ञांना आशा

Stock Market News : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल याबाबत विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शेअर बाजारही त्यास अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी रेल्वेच्या ३ शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यात आरव्हीएनएल, इरकॉन आणि टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेडचा समावेश आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकार हायस्पीड रेल्वे प्रकल्प, आधुनिकीकरण आणि हरित उपक्रमांना प्राधान्य देईल. एसकेआय कॅपिटल सर्व्हिसेसचे सीईओ आणि शेअर बाजार तज्ज्ञ नरिंदर वाधवा म्हणाले, 'आरव्हीएनएल, इरकॉन इंटरनॅशनल आणि टिटागड वॅगन्स सारख्या शेअर्सना याचा फायदा होऊ शकतो.

रेल विकास निगम लिमिटेड (RVNL)

 रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर गुरुवारी २.२५ टक्क्यांनी वधारून ४३७.०५ रुपयांवर बंद झाला. आरव्हीएनएलच्या समभागांनी गेल्या पाच वर्षांत १६०० टक्क्यांहून अधिक आणि गेल्या वर्षभरात सुमारे ४८ टक्के परतावा दिला आहे. वार्षिक आधारावर हा शेअर २.३८ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON)

हा शेअर गुरुवारी ४.४३ टक्क्यांनी वधारून २०२.६० रुपयांवर बंद झाला. इरकॉनच्या शेअरनं गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे ३६० टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हा शेअर १३.०८ टक्क्यांनी घसरला असून यंदा तो ६.३६ टक्क्यांनी घसरला आहे.

टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड (Titagarh)

टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडचा शेअर १.३७ टक्क्यांनी वधारून ९६०.४० रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरनं गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हा शेअर ११.६७ टक्क्यांनी घसरला असून यंदा तो १३.१६ टक्क्यांनी घसरला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner