Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या सलग तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल. मागील चार केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणेच २०२५-२६ चा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पही पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.
नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोखा म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प असतो. २०१९ पासून सरकारचा खर्च, उत्पन्न आणि आर्थिक धोरणं या सर्वांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, ज्याला वही-खातं असंही म्हटलं जातं.
१ फेब्रुवारी २०२५ रोजी सीतारामन संसदेत अर्थसंकल्प २०२५ सादर करतील. लोकसभेत सकाळी ११ वाजता त्यांचं भाषण सुरू होईल.
> केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत, दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या अधिकृत वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल.
> सरकारच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही अर्थसंकल्प प्रसारित केला जाईल.
> सीतारामन यांचं केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चं भाषण https://marathi.hindustantimes.com वरही थेट पाहता येणार आहे.
> अर्थसंकल्प २०२५ बद्दल सर्व ताज्या अपडेट्स हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या बजेटविषयक लाइव्ह ब्लॉगवर पाहता येतील.
> अर्थसंकल्पाची कागदी प्रत डिजिटल स्वरूपात केंद्र सरकारच्या www.indiabudget.gov.in. या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध असेल.
> राज्यघटनेनं विहित केल्याप्रमाणे वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यत: अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाची मागणी (डीजी), वित्त विधेयक इत्यादींसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज 'केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप'वर उपलब्ध असतील.
> अर्थसंकल्पाची कागदपत्रं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.
१९८० च्या दशकापासून भारतीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेतील परंपरा असलेला हलवा सोहळा केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीचा अंतिम टप्पा असतो.
अर्थ मंत्रालयानं ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली आणि आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्याआधी विविध मंत्रालयांशी चर्चा केली.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारनं अनेक पारंपारिक अर्थसंकल्पीय वैशिष्ट्ये काढून टाकली आहेत. यामध्ये २०१७ मधील मुख्य अर्थसंकल्पाशी रेल्वे अर्थसंकल्पाची सांगड घालणे, सादरीकरणाची तारीख महिन्याच्या अखेरीवरून १ फेब्रुवारी करणे आणि २०२१ मध्ये डिजिटल स्वरूपात स्विच करणे यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या