मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget 2024 : महिन्याला ३०० युनिट वीज मोफत; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Budget 2024 : महिन्याला ३०० युनिट वीज मोफत; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 01, 2024 01:18 PM IST

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या. सरकारने सौर योजनेची घोषणा करत ३०० युनिट मोफत वीज देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Budget 2024
Budget 2024

Budget 2024 update: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प  सादर केला.  यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारने सौर योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.  या अंतर्गत सोलर रूफटॉप योजना सुरू केली जाणार असून या योजनेत सहभागी कुटुंबाला तब्बल ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे.

Taxpayers Budget 2024 : करदात्याची घोर निराशा! इन्कम टॅक्सच्या दरात कोणताही बदल नाही!

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प  सादर करतांना त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मात्र मिळाला नाही. दरम्यान, सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'रूफटॉप सोलर प्रकल्पाच्या कुटुंबाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. यामुळे १८ हजार रुपयांची दरमहा बचत अपेक्षित आहे. एक कोटी सौर रूफटॉप योजनेंतर्गत १५००० हजार रुपयांचे अनुदान हे दिले जाणार आहे.

Budget 2024: 'वंदे भारत'बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा, ४१ हजार नवीन डबे बनवले जात असल्याची माहिती

२२ जानेवारी रोजी बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात २२ जानेवारी रोजी बैठक घेतली होती. यात १ कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या साठी "प्रधानमंत्री सूर्योदय योजना" सुरू करण्याचा निर्णय या बैतकीत घेण्यात आला होता. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, सौरऊर्जेचा वापर प्रत्येक घराला छतासह त्यांचे वीज बिल कमी करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजांसाठी खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यासाठी करता येईल.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या घरांच्या छतावर सौरऊर्जेचे युनिट बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. रहिवासी क्षेत्रातील ग्राहकांना छतावरील सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम राबवावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

WhatsApp channel