Budget 2024 stocks : देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार दिशादर्शन करेल व धोरणात्मक सातत्य कायम ठेवेल, असा विश्वास ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालनं व्यक्त केला आहे. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, सरकार पायाभूत सुविधा, भांडवली खर्च आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल. या पार्श्वभूमीवर, लार्ज कॅप सेगमेंटमधील ८ शेअर चांगली कमाई करून देऊ शकतात. कोणते आहेत हे शेअर? पाहूया…
आयसीआयसीआय बँक : मनीकंट्रोलनुसार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजनं आयसीआयसीआय बँकेच्या शेअरची टार्गेट प्राइस १३५० रुपये ठेवली आहे. सध्या हा शेअर १२६० रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. त्यात ८.५ टक्के वाढ अपेक्षित आहे.
एचसीएल टेक : एचसीएल टेकचा शेअर येत्या काही दिवसांत १७१० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज मोतीलाल ओसवालनं व्यक्त केलाय. इंजिनीअरिंग आणि संशोधन क्षेत्रातील मजबूत क्षमता आणि आउटसोर्सिंग संधी एचसीएलच्या महसुलात मोठी भर घालू शकतात.
कोल इंडिया : कोल इंडियाचा शेअर सध्या ५१२ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. हा शेअर ५५० रुपयांपर्यंत जाईल, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. धातू आणि खाण क्षेत्रात कोल इंडिया मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजची पहिली पसंती आहे.
एसबीआय : स्टेट बँकेचा शेअर सध्या ८८० च्या आसपास व्यवहार करत असून १९.५ टक्के वाढीसह तो १०१५ पर्यंत झेपावण्याचा अंदाज आहे. उत्तम क्रेडिट-डिपॉझिट रेश्यो आणि मजबूत तांत्रिक क्षमता एसबीआयच्या वाढील पोषक ठरू शकते.
एल अँड टी : 'मोतीलाल'नं एल अँड टीच्या शेअरमध्ये सुमारे १४ टक्के वाढीसह ४,१५० रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे. आज हा शेअर ३६२७ रुपयांवर ट्रेड करत आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा: मोतीलाल ओसवालनं महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये २१ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे हा शेअर ३,३०० रुपयांवर जाईल अशी अपेक्षा आहे.
मॅनकाइंड फार्मा : या कंपनीच्या शेअरमध्ये २३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. मोतीलालनं या शेअरवर २,६५० रुपयांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मजबूत ब्रँड दृष्टीकोन, शाश्वत उत्पन्न वाढ आणि उत्तम परताव्याचं प्रमाण लक्षात घेता कंपनीला आर्थिक वर्ष २०२४ ते २०२७ मध्ये १६ टक्के महसूल सीएजीआर अपेक्षित आहे.
चोला इन्व्हेस्ट : या कंपनीच्या शेअरमध्ये आगामी काळात १७ टक्के वाढीचा अंदाज आहे. हा शेअर १६६० रुपयांपर्यंत जाईल, असा मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा होरा आहे. चोला सध्या आठ फिनटेक कंपन्यांशी सहकार्यानं काम करत आहे.
(डिस्क्लेमर : या लेखातील तज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. ही केवळ शेअर्सच्या कामगिरीची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)