मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Union Budget 2024 : बजेटच्या आधी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक कराल?; तज्ज्ञांनी सुचवले हे १७ स्टॉक्स

Union Budget 2024 : बजेटच्या आधी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक कराल?; तज्ज्ञांनी सुचवले हे १७ स्टॉक्स

Jul 03, 2024 01:54 PM IST

budget 2024 stock picks : या महिन्याच्या चौथ्या आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांनी काही शेअरची नावं सुचवली आहेत.

बजेटच्या आधी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक कराल?; तज्ज्ञांनी सुचवले हे १७ स्टॉक्स
बजेटच्या आधी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक कराल?; तज्ज्ञांनी सुचवले हे १७ स्टॉक्स

stocks to buy before budget 2024 : भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारत असून नवनवे उच्चांक गाठत आहे. धोरणात्मक स्थैर्य आणि परकीय गुंतवणुकीचा वाढता ओघ यामुळं गुंतवणूकदार आशावादी दिसत आहेत. अशातच या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी यावर चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय अर्थसंकल्पात उद्योग-व्यवसायाला चालना देणाऱ्या अनेक घोषणा केल्या जातात. त्या-त्या क्षेत्रातील कंपन्यांवर याचा थेट परिणाम होत असतो. परिणामी शेअर बाजारातही पडसाद उमटतात. अर्थसंकल्पाच्या आधी व नंतर बाजारात बरीच हालचाल दिसते. यंदाचा अर्थसंकल्पही त्यास अपवाद नसेल. या पार्श्वभूमीवर आघाडीच्या वित्तीय विश्लेषक आणि सल्लागार संस्थांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन म्हणून काही शेअर्सची शिफारस केली आहे.

इनव्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीजच्या जेनी रिटा यांची शिफारस

जेनी रिटा यांनी पायाभूत सुविधा, संरक्षण आणि रेल्वेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. या क्षेत्रांना आगामी अर्थसंकल्पाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (L & T)

एल अँड टीचा शेअर सध्या ३६०० च्या आसपास आहे. यात १९ टक्के तेजी अपेक्षित असून हा शेअर ४३०० पर्यंत जाऊ शकतो. पायाभूत सुविधांसाठी कंपनीनं ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा येत्या काळात फायदा होणार आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंत २.७ लाख कोटी रुपयांचा समूह महसूल मिळविण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. ऑर्डर इनफ्लोमध्ये १०% वाढ अपेक्षित आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

या शेअरची सध्याची किंमत ५४०५ च्या आसपास असून यात आणखी १० टक्के वाढ अपेक्षित आहे. हा शेअर ५८१९ पर्यंत जाऊ शकतो. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी म्हणून एचएएलला ६.२२ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण अर्थसंकल्पाचा फायदा होणार आहे. कंपनीकडं ९४००० कोटींचं मजबूत ऑर्डर बुक आहे.

टीटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड

या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत १७७८ रुपये असून तो २०३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीशी संबंधित साधनसामुग्रीच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या टिटागड कंपनीला रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि पीएम गती शक्तीसारख्या उपक्रमांसाठी सरकारनं केलेल्या २.५५ लाख कोटी रुपयांच्या तरतूदीचा फायदा होईल.

लोवाक कॅपिटलच्या सीईओ ज्योती भंडारी यांची शिफारस

हुडको

हुडकोच्या शेअरची सध्याची किंमत २९३ रुपये असून येत्या तीन महिन्यात हा शेअर ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आगामी अर्थसंकल्पात गृहकर्जासाठी स्वस्त अर्थसहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे.

इरेडा

इरेडाच्या शेअरचा भाव सध्या २१७ च्या आसपास असून त्यात २५ टक्के वाढीची शक्यता आहे. अक्षय ऊर्जेच्या संदर्भातील सरकारी धोरण पाहता अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी अनुकूल तरतुदीची अपेक्षा आहे.

येस सिक्युरिटीजचे टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट लक्ष्मीकांत शुक्ला यांची शिफारस

भेल (BHEL)

हा शेअर ३२० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. २८५ रुपयांचा स्टॉप लॉस लावून यात गुंतवणूक करता येऊ शकते.

विप्रो

विप्रोचा शेअर सध्या ५४२ रुपयांच्या आसपास असून तो ५६० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णूकांत उपाध्याय याची शिफारस

प्राज इंडस्ट्रीज

प्राज इंडस्ट्रीजचा शेअर सध्या ७३७ रुपयांवर आहे. हा शेअर ७६० पर्यंत उसळण्याची शक्यता आहे.

बीईएल (BEL)

खरेदी रेंज : २९५ रुपये

स्टॉप-लॉस : २८३ रुपये

टार्गेट : ३४० रुपये

टाटा स्टील (Tata Steel)

खरेदी रेंज : १६९-१६८ रुपये

स्टॉप-लॉस : १५८ रुपये

टार्गेट : १८५-१९० रुपये

असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्सचे देवांग शहा यांची शिफारस

एपीएल अपोलो ट्यूब्स

ही कंपनी भारतातील स्ट्रक्चरल स्टील ट्यूबची सर्वात मोठी उत्पादक आहे. पायाभूत सुविधा, बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रांवर सरकारनं लक्ष केंद्रित केल्याचा एपीएल अपोलोला फायदा होणार आहे.

त्रिवेणी इंजिनीअरिंग

साखर आणि संलग्न उत्पादनं आणि अभियांत्रिकी अशा वैविध्यपूर्ण व्यवसायात असलेल्या त्रिवेणी इंजिनीअरिंगला इथेनॉलची वाढती मागणी आणि इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टांसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा फायदा होणार आहे.

अडोर वेल्डिंग

पायाभूत सुविधा, रेल्वे आणि जहाज बांधणी क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळं अडोर वेल्डिंग भरभराटीस येत आहे. कंपनी ऑटोमेशनमध्ये गुंतवणूक करत आहे आणि बाजारातील स्थान उंचावत आहे. कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत १४०६ रुपये आहे.

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (TCI)

भारतातील सर्वात मोठी एकात्मिक लॉजिस्टिक्स सेवा देणाऱ्या कंपनीला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा नक्कीच लाभ मिळेल.

कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांची शिफारस

गोदरेज अ‍ॅग्रोवेट

गोदरेज अ‍ॅग्रोवेटनं स्मार्ट कॉस्ट कटिंग आणि नवीन नेतृत्वाच्या मदतीनं सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदा होऊ शकतो. या कंपनीचा शेअर पडत असल्यानं गुंतवणुकीची आकर्षक संधी निर्माण झाली आहे.

एसबीआय

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेचा शेअर ९५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सध्या हा शेअर ८३८ रुपयांवर आहे.

असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्सची शिफारस

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सातत्यानं वाढत आहे. सध्या या शेअरची किंमत ३०९६ रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: वरच्या लेखातील मतं आणि शिफारसी विश्लेषक, तज्ञ आणि ब्रोकरेज फर्मच्या वैयक्तिक आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या नाहीत. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

WhatsApp channel