NPS Vatsalya Yojana : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अल्पवयीन मुलांसाठी आणलेल्या एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya) योजनेची सर्वाधिक चर्चा आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे.
एनपीएस वात्सल्य ही योजना पालकांना त्यांच्या मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रोत्साहन देते. या योजनेत सहभागी होऊन पालक आपल्या मुलांच्या भावी आर्थिक गरजांची तजवीज करू शकतात. वात्सल्य योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावे एनपीएस खातं उघडू शकतात व त्यात योगदान देऊ शकतात. मूल १८ वर्षांचं झाल्यावर वात्सल्य खात्यात जमा झालेली रक्कम आपोआप सर्वसाधारण एनपीएस खात्यात हस्तांतरीत केली जाते. याशिवाय, अल्पवयीन मुलानं १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ही योजना बिगर एनपीएस योजनांमध्ये देखील रूपांतरीत केली जाऊ शकते.
वात्सल्य योजना ही सध्या १८ ते ६० वयोगटासाठी सुरू असलेल्या एनपीएस योजनेचाच एक भाग आहे. ही योजना निवृत्तीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक समजली जाते. या योजनेत सहभागी गुंतवणूकदारांचे पैसे पारंपारिक पेन्शन योजनांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं गुंतवले जातात. शेअर मार्केट आणि रोखे यासारख्या बाजाराशी संबंधित साधनांमध्ये या गुंतवणुकीचं विभाजन केलं जातं. त्यामुळं अन्य फिक्स्ड-इन्कम पर्यायांच्या तुलनेत ही योजना उच्च परतावा मिळवून देण्यास सक्षम आहे. त्यातून सेवानिवृत्तीच्या बचतीत भरीव वाढ होते.
ही योजना तुलनेनं खूपच लवचिक आहे. जोखीम घेण्याची आपली क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार यातील गुंतवणूक पर्याय निवडता येतो. त्यात बदल करण्याचं स्वातंत्र्य देखील आपल्याला मिळतं. शिवाय, ही हस्तांतरणीय योजना आहे. नोकरी बदलामुळं आपल्या एनपीएस खात्यावर कोणताही परिणाम होत नाही.
SBI पेन्शन फंड
LIC पेन्शन फंड
UTI सेवानिवृत्ती उपाय
HDFC पेन्शन व्यवस्थापन कंपनी
ICICI प्रुडेन्शियल पेन्शन फंड व्यवस्थापन
कोटक महिंद्रा पेन्शन फंड
आदित्य बिर्ला सनलाइफ पेन्शन व्यवस्थापन
Tata पेन्शन व्यवस्थापन
मॅक्स लाइफ पेन्शन फंड व्यवस्थापन
Axis पेन्शन फंड व्यवस्थापन
या योजनेच्या माध्यमातून पालक आपल्या मुलाचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याबरोबरच मुलांना बचतीचे व गुंतवणुकीचे महत्त्वही पटवून देऊ शकतात. खालील तक्त्यावरून हे अधिक स्पष्ट होईल. समजा, तुमचं मूल तीन वर्षांचे आहे. ते १८ वर्षांचं होईपर्यंत त्याच्या वतीने या योजनेत गुंतवणूक केल्यास किती व कसा फायदा होईल?
पेन्शन योजनेचे नाव | १० वर्षांचा परतावा (in %) | मासिक एसआयपी (in Rs) | गुंतवलेली रक्कम (in Rs) | अंदाजित परतावा (in Rs) | एकूण परतावा (in Rs)
|
UTI Pension Fund | 14.28 | 10,000 | 18,00,000 | 45,00,518 | 63,00,518 |
HDFC Pension Management Company
| 14.15 | 10,000 | 18,00,000 | 44,19,993 | 62,19,993 |
Kotak Mahindra Pension Fund
| 14.00 | 10,000 | 18,00,000 | 43,28,538 | 61,28,538 |
ICICI Prudential Pension Fund Management
| 13.97 | 10,000 | 18,00,000 | 43,10,432 | 61,10,432 |
SBI Pension Funds
| 13.25 | 10,000 | 18,00,000 | 38,93,772 | 56,93,772 |
LIC Pension Fund
| 13.02 | 10,000 | 18,00,000 | 37,67,629 | 55,67,629 |
Source: National Pension Scheme |