मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Taxpayers Budget 2024 : करदात्याची घोर निराशा! इन्कम टॅक्सच्या दरात कोणताही बदल नाही!

Taxpayers Budget 2024 : करदात्याची घोर निराशा! इन्कम टॅक्सच्या दरात कोणताही बदल नाही!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 01, 2024 12:45 PM IST

Budget 2024-25 for Taxpayers : इन्कम टॅक्स स्लॅब आणि दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केली.

Taxpayers Budget 2024
Taxpayers Budget 2024

Budget 2024-25 for Taxpayers : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा फोल ठरली. सरकारनं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्राप्तिकराच्या दरात किंवा करांच्या टप्प्यांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.  

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) तोंडावर असल्यानं सरकार सर्वसामान्यांना खूष करणाऱ्या घोषणा करेल अशी चर्चा होती. त्यातही नोकरदारांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारनं करांच्या दर 'जैसे थे' ठेवले आहेत.

Budget 2024: 'वंदे भारत'बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा, ४१ हजार नवीन डबे बनवले जात असल्याची माहिती

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

'गेल्या दहा वर्षांत प्रत्यक्ष करांचं संकलन तिप्पट झालं आहे आणि विवरणपत्र (Income Tax Returns) भरणाऱ्यांची संख्या २.४ पटीनं वाढली आहे. करांच्या रूपानं सर्वसामान्य नागरिक देत असलेल्या या योगदानाचा वापर देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी होत आहे. यापुढंही होत राहील, असं आश्वासन निर्मला सीतारामन यांनी दिलं. करदात्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले.

केंद्र सरकारनं करांचे दर आधीच खूप कमी केले आहेत. नव्या कर योजनेनुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतउत्पन्न असलेल्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ही सूट केवळ २.२ लाख रुपये होती, याची आठवण सीतारामन यांनी दिली.

LPG Price hike : बजेटच्या दिवशीच धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या, असे आहेत नवे दर

इन्कम टॅक्स रिफंड अवघ्या दहा दिवसांत

गेल्या पाच वर्षांत करदात्यांच्या सेवेत सुधारणा करण्यावर आमचा भर राहिला आहे. फेसलेस असेसमेंट अँड अपील सुरू करून जुन्या अधिकारक्षेत्रावर आधारित मूल्यमापन प्रणालीत बदल करण्यात आला ज्यामुळे अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जबाबदारीत वाढ झाली. अद्ययावत प्राप्तिकर विवरणपत्र, नवीन फॉर्म २६ एएस आणि कर विवरणपत्र प्रीफिलिंग यामुळं कर विवरणपत्र भरणं अधिकाधिक सोपं झालं आहे. २०१३-१४ मध्ये इन्कम टॅक्स रिफंड मिळण्यासाठी सरासरी ९३ दिवस लागत होते, आज ही वेळ अवघ्या दहा दिवसांवर आली आहे.

WhatsApp channel