Bank Holidays List : तंत्रज्ञाच्या प्रगतीमुळे रोज बँकेत जाऊन काम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, असे असेल तरी काही कामे ही बँकेत जाऊनच करावी लागत असतात. या साठी बँकेत जाणे गरजेचे असते. त्यामुळे जर तुम्ही २३ तारखेला बँकेत जाण्याचे नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, बुद्ध पौर्णिनेनिमित्त बँकाना सुट्टी आहे. यामुळे नियोजन करून बँकेची कामे उरकावी लागणार आहे.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे. त्रिपुरा, महाराष्ट्र, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्टीच्या यादीनुसार मे २०२४ मध्ये १४ दिवस बँका बंद आहेत. मे महिन्यात महाराष्ट्र दिन/मे दिन (कामगार दिन), लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस, बसव जयंती/अक्षय तृतीया, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, राज्य दिन, बुद्ध पौर्णिमा आणि नजरुल जयंती साठी बँका बंद असतात. मात्र, वेगवेगळ्या राज्यांनुसार या सुट्ट्या बदलू शकतात. रिझर्व्ह बँकेने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सुट्ट्या आणि बँकांची खाती बंद करण्याअंतर्गत काही सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
मे महिन्याच्या अखेरिस २३ मे रोजी बुद्धपौर्णिमा आणि २५ मे रोजी मतदानाचा सहावा टप्पा असल्यामुळे देखील बँका या बंद राहतील. तर २५ मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार व २६ मे रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे. त्रिपुरा, ओरिसामध्ये नजरुल जयंती / लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (चौथा शनिवार) निमित्त बँका बंद राहतील. येत्या आठवड्यात बँका फक्त चार दिवस सुरु राहणार आहेत. बँकेचे व्यवहार बंद राहणार असल्याने नागरिकांनी डिजिटल बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम आणि नेट बँकिंग द्वारे व्यवहार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या