BSNL plan : बीएसएनएलचा जबरदस्त प्लान, एका महिन्यासाठी सर्वकाही फ्री
BSNL plan : ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विविध प्लॅन्स योजना राबवणाऱ्या बीएसएनएलने असाच एक यूनिक प्लान आणला आहे. हा रिचार्ज प्लान घेतल्यानंतर एका महिन्यासाठी सर्वकाही मोफत देण्यात आले आहे.
BSNL plan : दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी सतत नवीन रिचार्ज योजना दाखल करते. आज तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. हा बीएसएनएलचा रिचार्ज प्लॅन ४०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये उत्तम फायदे देखील उपलब्ध आहेत,
ट्रेंडिंग न्यूज
व्हॅलिडीटी
जर आपण बीएसएनएलच्या या शानदार रिचार्ज प्लानच्या किंमतीबद्दल बोललो तर या रिचार्ज प्लॅनची किंमत ३९७ रुपये आहे. बीएसएनएलच्या या ३९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोठा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १५० दिवसांची वैधता मिळते. ही योजना कंपनीच्या सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे.
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटाचा लाभ मिळतो. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना या प्लॅनमध्ये फ्री पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोनचाही लाभ घेता येणार आहे. त्याशिवाय बीएसएनएलच्या या ३९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात.
इतरही लाभ
या प्लॅनच्या कॉलिंगमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. व्हाउचर रिफिल करून, तुम्ही ३० दिवसांनंतरही अमर्यादित डेटा आणि कॉलिंग पुन्हा सुरू करू शकता. जर तुम्हाला बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही यूपीआय अॅपच्या मदतीने हा रिचार्ज प्लान रिचार्ज करू शकतात. इतकंच नाही तर कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊन हा प्लॅन रिचार्ज करू शकता. या प्लॅन व्यतिरिक्त, बीएसएनएलचे इतर अनेक उत्तम रिचार्ज प्लॅन आहेत.
संबंधित बातम्या