BSNL Live TV App launched for Android TV Users: एकीकडे रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीने आपल्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र, दुसरीकडे भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल अजूनही त्याच जुन्या किंमतीत ग्राहकांना प्लान ऑफर करत आहे. यामुळे अनेक ग्राहक बीएसएनएलला पसंती दर्शवत आहेत. बीएसएनएलने टेलिकॉमनंतर आता नव्या जगात प्रवेश केला आहे. कंपनीने आपले बीएसएनएल लाइव्ह टीव्ही ॲप लॉन्च करून इतर कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. कारण, इतर कंपनीच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्च स्वस्त असतील, यात काही शंका नाही. सध्या हे बीएसएनएल लाइव्ह टीव्ही ॲप फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
बीएसएनएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे या ॲपची माहिती शेअर केली आहे. बीएसएनएल लाइव्ह टीव्ही ॲप इंटरनेट, केबल टीव्ही आणि लँडलाइन टेलिफोन सेवा एकाच सीपीईद्वारे वापरल्या जात आहेत. याआधी बीएसएनएलने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फायबरद्वारे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन प्लान सुरू केला. वापरकर्त्यांना महागाईपासून वाचवण्यासाठी कंपनीने या प्लानची सुरुवाती किंमत १३० रुपये ठेवली.
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी सेवा आणि सिमच्या किमती वाढवल्याने बीएसएनएलला अच्छे दिन आले आहेत. एअरटेल आणि जिओमधून मोठ्या संख्येने मोबाइल युजर्स बीएसएनएलकडे वळत आहेत. बीएसएनएलचे दररोज आठ ते दहा हजार सिम खरेदी केले जात आहेत. मात्र, बीएसएनएलने आपल्या सेवेत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. अनेक खासगी कंपन्यांनी 5G ची सेवा सुरू केली आहे. लोकांमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवेला मोठी मागणी आहे. इंटरनेटवरील लोकांची वाढती गरज आणि भार यामुळे वेग वाढविण्याची गरज आहे. बीएसएनएल सध्या 4G सेवा देत आहे. बीएसएनएलने 5G जी सेवा सुरू करावी, अशी सर्वसामान्य ग्राहकांची मागणी आहे.
बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी १८४ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. कंपनी या प्लान अंतर्गत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभ देत आहे. या योजनेंतर्गत दररोज १०० एसएमएसचा लाभही दिला जात आहे. यासोबतच ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी हाय-स्पीड डेटाही दिला जात आहे. या रिचार्ज प्लॅनसह ग्राहकांना मोफत बीएसएनएल ट्यूनचा लाभ देखील मिळतो. कमी किमतीत एक महिन्याची वैधता प्लान हवा असेल, अशा ग्राहकांसाठी प्लान उपयुक्त ठरू शकतो.