बीएसएनएलचा ३९५ दिवसांचा धमाकेदार प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि ७९० जीबी डेटा, दररोज फक्त ६ रुपये खर्च
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बीएसएनएलचा ३९५ दिवसांचा धमाकेदार प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि ७९० जीबी डेटा, दररोज फक्त ६ रुपये खर्च

बीएसएनएलचा ३९५ दिवसांचा धमाकेदार प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि ७९० जीबी डेटा, दररोज फक्त ६ रुपये खर्च

Nov 09, 2024 06:20 PM IST

BSNL 395 Day Plan: बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी ३९५ दिवसांची वैधता असलेला सर्वात अनोखा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे.

बीएसएनएलचा ३९५ दिवसांचा धमाकेदार प्लान
बीएसएनएलचा ३९५ दिवसांचा धमाकेदार प्लान

BSNL Recharge: वारंवार रिचार्जचा त्रास नको असलेल्या ग्राहकांसाठी बीएसएनएलने एक अनोखा प्रीपेड प्लान आणला आहे. हा प्लान एका वर्षापेक्षा जास्त वैधतेसह येतो आणि त्याची किंमत २ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटासह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी २ हजार ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. बीएसएनएलचा हा प्रीपेड प्लान ३९५ दिवसांच्या वैधतेसह येतो म्हणजेच हा प्लान जवळपास ४०० दिवसांच्या वैधतेसह येतो. किंमत आणि वैधतेनुसार सरासरी काढली तर, ग्राहकांना दिवसाला फक्त ६ रुपये खर्च येतो. तर, मासिक खर्च ३० रुपये असेल. हा बीएसएनएलचा सर्वात लांब वैधता असलेला प्रीपेड प्लान असून इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे असे प्लान नाहीत.

या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण ७९० जीबी डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटस्पीड ४० केबीपीएसपर्यंत कमी होतो. प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. प्लानमध्ये ग्राहकांना हार्डी गेम्स + चॅलेंजर एरिना गेम्स + गेमऑन अ‍ॅस्ट्रोटेल + गेमियम + लिस्टन पॉडकास्ट + झिंग म्युझिक + बीएसएनएल ट्यून्स सारखे फायदे देखील मिळतात. डेली एसएमएसची मर्यादा संपल्यानंतर लोकलसाठी ८० पैसे, नॅशनलसाठी १.२० रुपये प्रति एसएमएस आणि इंटरनॅशनलसाठी ६ रुपये प्रति एसएमएस आकारले जातील.

बीएसएनएलचा नवा लोगो लॉन्च

बीएसएनएलचा नवा लोगो लॉन्च करण्यात आला आहे. नव्या लोगोमध्ये आता कनेक्टिंग इंडियाऐवजी कनेक्टिंग भारत लिहिलेले दिसेल. नव्या लोगोचा रंगही वेगळा आहे. ळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बीएसएनएलचा नवा लोगो शक्ती, विश्वास आणि पोहोचीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात बीएसएनएलच्या सात नव्या सेवांचा ही शुभारंभ करण्यात आला. यामध्ये स्पॅम-फ्री नेटवर्क, वाय-फाय रोमिंग आणि डायरेक्ट-टू-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

टेक्नोलॉजीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

बीएसएनएलने 5G कनेक्टिव्हिटीसाठी सीडॅकशी भागीदारी केली आहे. टेक्नोलॉजीच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. मेड इन इंडिया उपकरणांचा लाभ घेऊन देशाच्या दूरसंचार क्षेत्रात झालेली प्रगती या उपक्रमातून दिसून येते. 5G व्यतिरिक्त बीएसएनएलने स्वतःचा 4G टेलिकॉम स्टॅक तयार केला आहे. यामुळे 4G वरून 5G मध्ये स्वीच करणे सोयीस्कर होईल. युजर्सचा अनुभव आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी कंपनीने अनेक फीचर्स लॉन्च केले असून बिल्ट-इन स्पॅम ब्लॉकर त्यापैकीच एक आहे.

Whats_app_banner