BSNL: १६० दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान, ३२० जीबी डेटासह फ्री कॉल्स आणि एसएमएची सुविधा मिळणार!-bsnl 997 rs prepaid plan comes with unique 160 days validity and daily 2gb data ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  BSNL: १६० दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान, ३२० जीबी डेटासह फ्री कॉल्स आणि एसएमएची सुविधा मिळणार!

BSNL: १६० दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान, ३२० जीबी डेटासह फ्री कॉल्स आणि एसएमएची सुविधा मिळणार!

Sep 22, 2024 10:23 PM IST

BSNLBSNL Prepaid Plan: बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी १६० दिवसांची युनिक व्हॅलिडिटी असलेला प्लान आणला आहे, ज्यात दररोज २ जीबी डेटा मिळतो.

बीएसएनएलचा धमाकेदार प्रीपेड प्लान
बीएसएनएलचा धमाकेदार प्रीपेड प्लान

BSNL Recharge: जर तुम्ही दीर्घ वैधता असलेल्या स्वस्त प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा प्लानबद्दल सांगत आहोत, ज्याची व्हॅलिडीटी १६० दिवसांची असेल. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी १६० दिवसांची युनिक व्हॅलिडिटी असलेला प्लान लॉन्च केला आहे, ज्यात दररोज २ जीबी डेटा मिळतो.  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे १६० दिवसांचा प्लान नाही. ज्या लोकांना दरमहिन्याला रिचार्ज करायला कंटाळा येतो, अशा ग्राहकांसाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. एवढेच नाही तर हा प्लान परवडणाऱ्या किमतीत येतो. या प्लानची सरासरी काढली असता ग्राहकाला दिवसाला ७ रुपये खर्च येतो. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या प्रीपेड प्लॅनबद्दल!

खरे तर आम्ही बीएसएनएलच्या ९९७ रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल बोलत आहोत. हा काही नवीन प्लॅन नाही, पण कंपनी बऱ्याच दिवसांपासून हा प्लान ऑफर करत आहे. बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा प्रीपेड प्लान १६० दिवसांच्या वैधतेसह येतो आणि या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण ३२० जीबी डेटा मिळेल. किंमत आणि वैधतेनुसार प्लानमध्ये दैनंदिन खर्च सुमारे ७ रुपये असेल.

या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि २ जीबी डेटासह सर्व नेटवर्कवर दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये झिंग म्युझिक, व्वा एंटरटेनमेंट, बीएसएनएल ट्यून्स आणि लिस्टन पॉडकास्टसह अनेक गेम्ससह अतिरिक्त फायदे देखील समाविष्ट आहेत.

बीएसएनएल ज्या सर्कलमध्ये काम करते त्या सर्व सर्कलच्या ग्राहकांसाठी हा प्लान उपलब्ध आहे. बीएसएनएल हळूहळू अनेक शहरांमध्ये 4G सुरू करत आहे. १ लाख साइट्सवर रोलआऊट पूर्ण करण्यासाठी कंपनीला आणखी काही महिने लागतील. चांगली गोष्ट म्हणजे, आतापर्यंत त्याचे 4G नेटवर्क २५ हजार साइट्सवर रोलआउट करण्यात आले आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते ७५ हजार साइट्सवर रोलआउट केले जाईल.

जिओचा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओकडे ही बीएसएनएलप्रमाणेच प्रीपेड प्लान आहे, पण त्याची वैधता फक्त ९८ दिवसांची आहे. जिओच्या ९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण १९६ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनचे ग्राहक अनलिमिटेड 5G डेटा ऑफरसाठी पात्र आहेत. प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे. वैधता आणि किंमतीनुसार या प्लानची दैनंदिन किंमत सुमारे १० रुपये असेल. जिओकडे १०२८ रुपये, १०२९ रुपये, १०४९ रुपये आणि १२९९ रुपयांचे प्लान आहेत. या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो.

एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे, ज्यात दररोज २ जीबी डेटा मिळतो. परंतु, हा प्लान फक्त ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस मिळतात. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5G डेटा ऑफरसाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियून (२२+ ओटीटी), रिवॉर्डमिनी सब्सक्रिप्शन, अपोलो २४/७ सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिक अतिरिक्त बेनिफिट्स म्हणून मिळतात. लॉन्ग व्हॅलिडिटीबद्दल बोलायचे झाले तर एअरटेलचा ३५९९ रुपयांचा प्लान देखील आहे, जो ३६५ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटासह येतो.

Whats_app_banner