Stocks To Buy : आज खरेदी करा हे ५ ब्रेकआउट स्टॉक्स, सुमीत बागरिया यांची शिफारस
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : आज खरेदी करा हे ५ ब्रेकआउट स्टॉक्स, सुमीत बागरिया यांची शिफारस

Stocks To Buy : आज खरेदी करा हे ५ ब्रेकआउट स्टॉक्स, सुमीत बागरिया यांची शिफारस

Jan 22, 2025 10:14 AM IST

Stocks To Trade Today : चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया यांनी आजच्या दिवशी ट्रेडिंग करण्यासाठी ५ शेअर्सची शिफारस केली आहे.

Stocks To Buy : आज खरेदी करा हे ५ ब्रेकआउट स्टॉक्स, सुमीत बागरिया यांची शिफारस
Stocks To Buy : आज खरेदी करा हे ५ ब्रेकआउट स्टॉक्स, सुमीत बागरिया यांची शिफारस

Breakout Stocks To Buy or Sell : भारतीय शेअर बाजारात सध्या असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर नेमके पैसे कुठं लावावेत याविषयी गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया यांनी काही शिफारशी केल्या आहेत.

मंगळवारी बाजारात मोठी घसरण झाली. निफ्टी ५० निर्देशांक २९१ अंकांनी घसरून २३०५३ वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १२३५ अंकांनी घसरून ७५८३८ वर बंद झाला, तर निफ्टी बँक निर्देशांक ७२७ अंकांनी घसरून ४८६२३ वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात मोठी घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप-१०० निर्देशांक २.३१ टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉल कॅप-१०० निर्देशांक २.२८ टक्क्यांनी घसरले आहेत. निफ्टी रियल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि पीएसयू बँकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली असून, सर्वच क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक बंद झाले आहेत.

बागरिया यांच्या मते, 'निफ्टीला महत्त्वपूर्ण आधार आहे आणि सध्या तो २३,८५० ते २३,८०० वर आहे. २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल येत असल्यानं व्यापाऱ्यांनी विशिष्ट शेअरबाबत दृष्टिकोन ठेवावा. तांत्रिकदृष्ट्या मजबूत दिसणारे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. इंट्राडे ट्रेडिंगसाठी तांत्रिकदृष्ट्या मजबूत ब्रेकआऊट स्टॉक्सचा विचार करता येईल.

बागरिया यांनी अमाइन्स अँड प्लास्टिसायझर, पारादीप फॉस्फेट्स, तैनवाला केमिकल्स, आरएमसी आणि टेक्निकम ऑर्गेनिक्स हे ५ शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

अमाइन्स आणि प्लास्टिसायझर : हा शेअर ३०३.२० रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ३३० रुपये आणि स्टॉप लॉस २९२ रुपये ठेवा.

पारादीप फॉस्फेट : हा शेअर १२४.२० रुपये दराने खरेदी करा. टार्गेट प्राइस १३४ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस १२० रुपये ठेवा.

तैनवाला केमिकल्स : हा शेअर २९३.४५ रुपयांवर खरेदी करा. लक्ष्य ३२० रुपये आणि स्टॉप लॉस २८२ रुपये ठेवा.

आरएमसी : हा शेअर ९८५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट १०६० रुपये आणि स्टॉपलॉस ९५० रुपये ठेवा.

टेक्निकम ऑर्गेनिक्स : हा शेअर ७२.३९ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ७८ रुपये आणि स्टॉप लॉस ७० रुपये ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner