पुणे : पुण्यातील आघाडीचे आणि भविष्याभिमुख रिअल इस्टेट डेव्हलपर ब्रम्हाकॉर्प लिमिटेड यांनी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन केल्यानंतर निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमध्ये ग्राहकांची वाढती मागणी अनुभवत मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवली आहे.
आजकालचे गृहखरेदीदार केवळ लक्झरी व लोकेशन शोधत नाहीत, तर टिकाऊपणा, सोयीसुविधा आणि भविष्याच्या दृष्टीने तयार असलेल्या जीवनशैलीचा विचार करतात. अशा प्रकारचे विकास प्रकल्प तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या तरुण ग्राहक, पर्यावरणाचा विचार करणाऱ्या कुटुंबीयांसाठी तसेच भविष्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक ठरतात.
सरकारकडून ई-मोबिलिटीसाठी होत असलेली आक्रमक पुढाकार, वाढत्या इंधन दरासह वाढलेली पर्यावरणाबद्दल जागरूकता यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकाराला गती मिळाली आहे. त्यामुळे ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर हे आता रिअल इस्टेट क्षेत्रात एक महत्त्वाचे वेगळेपण ठरत आहे. उपलब्ध माहितीनुसार, या वाढीला चालना देण्यासाठी पुण्यातील ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा विस्तार झाला असून जानेवारी २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील ३,०७३ चार्जिंग स्टेशनपैकी १,८९४ पुण्यात आहेत.
“इलेक्ट्रिक वाहने ही फक्त एक ट्रेंड राहिलेली नाहीत—तर ती आपल्या जीवनशैली व प्रवासाच्या पद्धतीतील बदलाचे प्रतीक आहेत. ब्रम्हाकॉर्प मध्ये आम्ही हा बदल तत्काळ स्वीकारला असून आमच्या नवीन प्रकल्पांमध्ये ईव्ही चार्जिंगच्या सुविधा समाविष्ट केल्या आहेत,” असे ब्रम्हाकॉर्प लिमिटेडचे सह-अध्यक्ष श्री. दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. “खरेदीदार आता अशा घरांचा शोध घेत आहेत जे भविष्यातील जीवनशैलीस अनुरूप असतील.”
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार पुढील दशकात प्रचंड वेगाने वाढणार असल्याचा अंदाज आहे, आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा हा एक महत्त्वाचा घटक आहे. याच विचाराने पुढाकार घेत ब्रम्हाकॉर्प लक्झरी, सोयी सुविधा आणि टिकाऊपणा यांचा समन्वय साधणाऱ्या विचारपूर्वक डिझाइन केलेल्या जागा विकसित करत आहे.
ब्रम्हाकॉर्प बद्दल:
१९८२ साली स्थापन झालेली ब्रम्हाकॉर्प ही लक्झरी रिअल इस्टेटमध्ये नावाजलेली कंपनी असून तिच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि उच्च दर्जाच्या प्रकल्पांसाठी ओळख निर्माण झाली आहे. पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने शेरटन ग्रँड पुणे, एफ-रेसिडेन्सेस आणि ले मेरिडियन स्पा अँड रिसॉर्ट महाबळेश्वर यांसारख्या नावाजलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली, ब्रम्म्हाकॉर्प उत्कृष्टता, पारदर्शकता आणि नाविन्यतेच्या मूल्यांवर आधारित उद्योगमानक निश्चित करत आहे. भविष्यावर लक्ष केंद्रित करत कंपनी आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असून, भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाढीस चालना देत आहे.
संबंधित बातम्या