एनटीपीसीकडून १५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचं कंत्राट मिळताच BPCL कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ, किती झाला भाव?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एनटीपीसीकडून १५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचं कंत्राट मिळताच BPCL कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ, किती झाला भाव?

एनटीपीसीकडून १५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचं कंत्राट मिळताच BPCL कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ, किती झाला भाव?

Dec 26, 2024 12:11 PM IST

BPCL Share Price News : बीपीसीएलला १५० मेगावॅट सौर पीव्ही वीज प्रकल्पाचं कंत्राट मिळाल्यामुळं कंपनीचे शेअर सध्या डिमांडमध्ये आहेत. या प्रकल्पामुळं कंपनीला १०० कोटींचा वार्षिक महसूल अपेक्षित आहे.

एनटीपीसीकडून १५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचं कंत्राट मिळताच बीपीसीएलच्या शेअरमध्ये मोठी वाढ, किती आहे आजचा भाव?
एनटीपीसीकडून १५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचं कंत्राट मिळताच बीपीसीएलच्या शेअरमध्ये मोठी वाढ, किती आहे आजचा भाव?

Share Market News : तब्बल १५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर बीपीसीएल कंपनीचे शेअर आज तेजीत आहेत. बीपीसीएल निफ्टी टॉप गेनरच्या यादीत आहे. एनटीपीसीच्या १५० मेगावॅट सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे.

एनएसईवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर सकाळी ९.४५ वाजता ६.४५ रुपये म्हणजेच २.२६ टक्क्यांनी वधारून २९८.६० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षभरात बीपीसीएलच्या शेअरमध्ये जवळपास ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सौर प्रकल्पाच्या कंत्राटाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर हा प्रकल्प दोन वर्षांच्या कालावधीत ७५६.४५ कोटी रुपयांच्या अंदाजित भांडवली खर्चासह विकसित केला जाईल आणि सुमारे ४०० दशलक्ष युनिट स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करून सुमारे १०० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

बीपीसीएलनं संपूर्ण भारतात एनटीपीसीच्या १,२०० मेगावॅटच्या आयएसटीएस-कनेक्टेड सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सौर ऊर्जा जनरेटर निवडण्याशी संबंधित निविदामध्ये भाग घेतला होता.

काय आहे कंपनीची योजना?

कंपनीच्या संचालक मंडळानं २४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत आंध्र प्रदेशच्या पूर्व किनाऱ्यावर ६१०० कोटी रुपये खर्चून ग्रीन फिल्ड रिफायनरी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी प्रकल्पपूर्व उपक्रम राबविण्यास मान्यता दिली. यामध्ये विविध प्रकारची पूर्वतयारीअभ्यास, जमिनीची ओळख आणि संपादन, सविस्तर व्यवहार्यता अहवाल तयार करणे, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, मूलभूत डिझाइन अभियांत्रिकी पॅकेज, फ्रंट एंड अभियांत्रिकी डिझाइन इत्यादींचा समावेश आहे.

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) इथं पृष्ठभागावरील कोळसा गॅसिफिकेशनद्वारे कोळशापासून सिंथेटिक नैसर्गिक वायू प्रकल्प उभारण्याची शक्यता शोधण्यासाठी कंपनी आणि कोल इंडिया यांच्यात या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत एक नॉन-बाइंडिंग सामंजस्य करार करण्यात आला. या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारात दिसत आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner