देव दिवाळीची भेट! सरकारी कंपनी शेअरहोल्डर्सना देणार एकावर २ शेअर मोफत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  देव दिवाळीची भेट! सरकारी कंपनी शेअरहोल्डर्सना देणार एकावर २ शेअर मोफत

देव दिवाळीची भेट! सरकारी कंपनी शेअरहोल्डर्सना देणार एकावर २ शेअर मोफत

HT Marathi Desk HT Marathi
Nov 11, 2024 07:34 PM IST

NMDC Bonus Share news : एनएमडीसी या सरकारी कंपनीनं शेअरहोल्डर्सना मोठी भेट दिली आहे. एका शेअरवर दोन शेअर मोफत देण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.

पेनी स्टॉक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी
पेनी स्टॉक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी

Bonus Stocks news : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनएमडीसी लिमिटेडनं सोमवारी २:१ या प्रमाणात इक्विटी शेअर्स जारी करण्यास मंजुरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांसह या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

एक्सचेंज फाइलिंगनुसार, पात्र भागधारकांना एका शेअरवर कंपनीचे दोन शेअर्स मोफत दिले जातील. एनएमडीसी ५८६ कोटींपेक्षा जास्त बोनस शेअर्स जारी करणार आहे. हे शेअर्स १० जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केले जातील. कंपनी गेल्या १६ वर्षांनंतर बोनस शेअर्स देत आहे. यापूर्वी एनएमडीसीनं सन २००८ मध्ये एका शेअरसाठी २ बोनस शेअर्स जारी केले होते. एनएमडीसीनं २०१६, २०१९ आणि २०२० मध्ये आपले इक्विटी शेअर्स परत खरेदी (Buyback) केले आहेत. 

कंपनीच्या शेअरची स्थिती काय?

सोमवारी व्यवहारादरम्यान एनएमडीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली. कंपनीचा शेअर आज २३३.५० रुपयांवर बंद झाला. २८६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास १९ टक्क्यांनी घसरला आहे. पाच दिवसांत हा शेअर २ टक्के आणि सहा महिन्यांत ९ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत ११ टक्के आणि वर्षभरात ३४ टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीचा शेअर पाच वर्षांत १३५ टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीचे तिमाही निकाल कसे?

एनएमडीसीने जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल सोमवारी, ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा १७ टक्क्यांनी वाढून १,१९५.६३ कोटी रुपये झाला आहे. बीएसईनं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १०२४.८६ कोटी रुपये होता. सरकारी मालकीच्या खाण कंपनीचे मुख्य कामकाजातून मिळणारे उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत २२.५४ टक्क्यांनी वाढून ४,९१८.९१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ४,०१३.९८ कोटी रुपये होते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner