Boat IPO news : इलेक्टॉनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी बोट अर्थात बोट लाइफस्टाइल लवकरच आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. अत्यंत विश्वासार्ह आणि दर्जेदार इलेक्ट्रॉनिक ब्रँड असलेल्या या कंपनीच्या आयपीओमुळं गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
बॉटनं आयसीआयसीआय सिक्युरिटीज, गोल्डमन सॅक्स आणि नोमुरा या कंपन्यांची पुढील आर्थिक वर्षासाठी ३० ते ५० कोटी डॉलरच्या आयपीओसाठी बँकर म्हणून निवड केली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज आयपीओचं नेतृत्व करेल, अशी माहिती मनी कंट्रोलच्या सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी १.५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकनाची मागणी करू शकते.
बॉटनं २०२२ मध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता, परंतु बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळं तो पुढे ढकलण्यात आला होता. वॉरबर्ग पिंकस आणि मलबार इन्व्हेस्टमेंट्स या गुंतवणूकदारांकडून कन्व्हर्टिबल प्रिफर्ड स्टॉकच्या माध्यमातून १.२ अब्ज डॉलर्सच्या किमान मूल्यांकनावर ६० दशलक्ष डॉलर्सचा खासगी निधी मिळवला.
२०१५ मध्ये अस्तित्वात आलेल्या अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी २०१५ मध्ये स्थापन केलेल्या बॉटने आतापर्यंत १७१ दशलक्ष डॉलरचा निधी गोळा केला आहे. भारताच्या वियरेबल्स सेगमेंटमध्ये कंपनीचा २६.७ टक्के मार्केट शेअर आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल ५ टक्क्यांनी घसरून ३,२८५ कोटी रुपयांवर आला आहे. तर कंपनीचा तोटा निम्म्याने घटून ७०.८ कोटी रुपये झाला आहे. बोट कंपनीनं सकारात्मक एबिटडाची नोंद केली आणि दिवाळीच्या हंगामात कंपनीच्या विक्रीत वाढ दिसून आली.