BN Rathi Securities Bonus Shares News : बीएन राठी सिक्युरिटीज लिमिटेडच्या शेअरमध्ये तुमची गुंतवणूक असेल तर नव्या वर्षात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांना दुहेरी आनंदवार्ता दिली आहे. कंपनीनं शेअर्सचं विभाजन करून बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे.
बीएन राठी सिक्युरिटीजचा शेअर शुक्रवारी २.४५ टक्क्यांनी घसरून २६६.९५ रुपयांवर व्यवहार करत होता. या आठवड्यात कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला कॉर्पोरेट निर्णयाची माहिती दिली आहे. त्यानुसार, २४ जानेवारी २०२५ ही तारीख बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून घोषित करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार, १० रुपये अंकित मूल्य असलेल्या प्रत्येक समभागाचे १० भागांमध्ये विभाजन होणार आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली येईल.
पात्र गुंतवणूकदारांना शेअर बोनस म्हणून शेअर बोनसही देणार असल्याचं कंपनीनं म्हटले आहे. याची रेकॉर्ड डेटही २४ जानेवारी २०२५ आहे.
बीएन राठी सिक्युरिटीजच्या समभागांनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ८० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभर हा शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत १७६ टक्के नफा झाला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २९१ रुपये आहे. कंपनीचा साप्ताहिक नीचांकी स्तर ८६.६५ रुपये आहे.
गेल्या तीन वर्षांत बीएन राठी सिक्युरिटीजच्या शेअरच्या किमतीत ६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत ५ वर्षात १८०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप २७६ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या