BMW CE 04 : बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतीय बाजारात; किंमत ऐकून चक्रावून जाल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  BMW CE 04 : बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतीय बाजारात; किंमत ऐकून चक्रावून जाल!

BMW CE 04 : बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतीय बाजारात; किंमत ऐकून चक्रावून जाल!

Updated Jul 24, 2024 03:31 PM IST

bmw ce 04 electric scooter : बीएमडब्ल्यू कंपनीनं भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सीई ०४ लाँच केली आहे. काय आहेत या स्कूटरची वैशिष्ट्ये? पाहूया…

बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतीय बाजारात; किंमत ऐकून चक्रावून जाल!
बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतीय बाजारात; किंमत ऐकून चक्रावून जाल!

bmw ce 04 electric scooter : जगातील प्रथितयश मोटर कंपनी बीएमडब्ल्यूनं भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात एन्ट्री केली आहे. कंपनीनं आपली बीएमडब्ल्यू सीई ०४ इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज असलेल्या या स्कूटरची एक्स शोरूम किंमत १४.९० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

बीएमडब्ल्यूच्या इलेक्ट्रिक कार गेल्या काही काळापासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु टू व्हीलर ईव्ही लाँच करण्यास कंपनीनं वेळ घेतला. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. सीई ०४ ही बीएमडब्ल्यूची प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही स्कूटर सर्वांनाच परवडणारी नाही.

काय आहे खासियत?

या स्कूटरमध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर ३१ किलोवॅटचं आउटपूट देते. ४१ बीएचपी पॉवर आणि ६१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर २.६ सेकंदात ० ते ५० किमी प्रति तास वेग पकडू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे. या स्कूटरचा जास्तीत जास्त वेग १२० किमी प्रति तास आहे. यात राइड मोड, १०.२५ इंच टीएफटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स सुविधा आहेत.

एकदा चार्ज केली की १३० किमी धावणार

स्कूटरमध्ये ८.५ केडब्ल्यूएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर १३० किमीची रेंज देते. बॅटरी चार्ज होण्यास ४ तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. चार्जिंगचा वेळ जास्त वाटत असल्यास कंपनी ग्राहकांना काही किंमत आकारून फास्ट चार्जर ऑफर करते. या चार्जरचा वापर केल्यास बॅटरी १ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. सीई ०४ च्या बॉडी पॅनेलला स्टायलिश डिझाइन देण्यात आलं आहे. स्कूटरची सीट बेंचसारखी आहे. एक लहान विंडस्क्रीन किंवा चाके आणि ऑफसेट मोनोशॉक सारख्या डिझाइन घटकांचा समावेश आहे.

यात सायकल स्टाइलबॉडी पॅनेलच्या खाली स्टीलडबल लूप फ्रेम देण्यात आली आहे. यात समोरच्या बाजूस सिंगल ब्रिज टेलिस्कोपिक काटा आणि मागच्या बाजूला सरळ सस्पेंशन स्ट्रट असलेला एकतर्फी स्विंगआर्म देण्यात आला आहे. स्कूटर १५ इंचाच्या चाकांवर चालते. गाडीच्या दोन्ही टोकाला २६५ मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. स्टँडर्ड म्हणून यात एबीएस देण्यात आलं आहे. सध्या ही स्कूटर सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ती इम्पिरियल ब्लू आणि फिकट सफेद रंगात खरेदी करता येणार आहे. या स्कूटरचं बुकिंग सुरू झालं आहे.

Whats_app_banner