Massive Discount on iPhone, Google and Samsung Smartphones: मोठ्या सवलतीसह महागडे फोन खरेदी करायचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर आजपासून ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात झाली. या स्फोटक सेलमध्ये स्मार्टफोनवर जोरदार डील्स दिल्या जात आहेत. सेलमध्ये अॅपल, सॅमसंग किंवा गुगलकडून प्रीमियम फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.
सेलमध्ये या कंपन्यांच्या प्रीमियम फोनवर १० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अॅक्सिस, एचडीएफसी, आयडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे ईएमआय व्यवहार करणाऱ्या युजर्संना १० टक्के सूट (अटी लागू) मिळणार आहे. तसेच, हे फोन तुम्ही जबरदस्त एक्स्चेंज बोनससह खरेदी करू शकता. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
गुगल पिक्सल ९ प्रोच्या १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १ लाख ०९ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये हा फोन १० हजार रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकता. या सवलतीसाठी ग्राहकाला आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना फोनवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकाला ६५ हजार ६०० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये जी४ टेन्सर चिपसेट ऑफर करत आहे. यात ४८ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असून मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर फ्रंटवर सेल्फीसाठी कंपनी ४२ मेगापिक्सलचा कॅमेरा देत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लस 5G च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसह सेलमध्ये ६४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना ५ टक्के कॅशबॅकसह फोन मिळणार आहे. हा फोन ग्राहक आकर्षक ईएमआयवरही खरेदी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकाला ६० हजार ६०० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा क्वाड एचडी+ डिस्प्ले मिळेल. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये एक्सीनॉस २४०० चिपसेट मिळेल. फोनचा मेन कॅमेरा ५० मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४ हजार ९०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला आयफोनचा टील कलर व्हेरिएंट ७९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये ग्राहक हा फोन १५०० रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. उत्तम ईएमआयवर ही आयफोन १६ तुमचा होऊ शकतो. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहक या फोनची किंमत ६० हजार ६०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डधारकांना हा फोन ५ टक्के कॅशबॅकसह मिळणार आहे. या फोनमध्ये कंपनीचा ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. यात आयफोन ए१८ प्रोसेसर देण्यात आला आहे.