Flipkart: फ्लिपकार्टची तगडी ऑफर! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 5G फोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart: फ्लिपकार्टची तगडी ऑफर! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 5G फोन

Flipkart: फ्लिपकार्टची तगडी ऑफर! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 5G फोन

Nov 24, 2024 10:55 PM IST

5G Smartphones Under 10000: फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये 5G स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 5G फोन!
१० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 5G फोन!

Black Friday Sale 2024: फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला असून सेलमध्ये विविध ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. कमी बजेटमध्ये 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेले ग्राहकांसाठी या सेलमध्ये खूप काही आहे. सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहक आपला आवडता फोन मोठी बचत करू शकतात. या सेलमध्ये १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक फोन उपलब्ध आहेत. 

१) विवो टी ३ लाइट 5G

विवो टी ३ लाइट 5G हा विवोचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. सेलमधील ऑफर्सनंतर फोनचा १२८ जीबी व्हेरिएंट ९ हजार ४९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये ६.५६ इंचाचा डिस्प्ले, ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी ६३०० चिपसेट आणि ५००० एमएएच बॅटरीसह ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे.

२) पोको एम ६ 5G

पोको एम ६ 5G सेलमधील ऑफर्सनंतर फोनचा ६४ जीबी व्हेरिएंट ७ हजार ४९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी ६१००+ चिपसेट आणि ५००० एमएएच बॅटरीसह ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे.

३) रेडमी १३ सी 5G

रेडमी १३ सी 5G सेलमधील ऑफर्सनंतर फोनचा 4+128 जीबी व्हेरिएंट ९ हजार १९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले, डायमेंसिटी ६१००+ चिपसेट आणि ५००० एमएएच बॅटरीसह ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसह येतो.

४) मोटो जी ०४ एस 5G

मोटो जी ०४ एस 5G सेलमधील ऑफर्सनंतर फोनचा ४+६४ जीबी व्हेरिएंट ७ हजार २९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, युनिसॉक टी ६०६ चिपसेट आणि ५००० एमएएच बॅटरीसह ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस साउंड सपोर्ट उपलब्ध आहे.

५) इनफिनिक्स हॉट ५० 5G

इनफिनिक्स हॉट ५० 5G सेलमधील ऑफर्सनंतर फोनचा ८+१२८ जीबी व्हेरिएंट ८ हजार ९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले, ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी ६३०० चिपसेट आणि ५००० एमएएच बॅटरीसह ४८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. फोन ७.८ एमएम पातळ आहे. फोनमध्ये अ‍ॅपलसारखा डायनॅमिक नॉच आहे. फोनमध्ये एआय फीचर्सचाही सपोर्ट आहे.

Whats_app_banner