Massive Discount on Samsung Watch And Buds: कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन सॅमसंगच्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. नुकतीच कंपनीने त्यांच्या गॅलॅक्सी वेअरेबल्स लाइन-अपवर ऑफर्सची घोषणा केली. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना सॅमसंग गॅलॅक्सी वॉच ७, सॅमसंग गॅलॅक्सी बड्स ३ आणि सॅमसंग गॅलॅक्सी बड्स एफई अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली.
सेलमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी वॉच ७ जवळपास १२,००० रूपयांच्या सूटसह उपलब्ध असेल, यात कॅशबॅक आणि अपग्रेड बोनसचा समावेश आहे. गॅलॅक्सी बड्स३ प्रो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्वरित कॅशबॅक किंवा ५००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. ग्राहक जवळपास २४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा फायदा घेऊ शकतात. तसेच, नवीन गॅलॅक्सी एस आणि झेड सिरीज स्मार्टफोन्स खरेदी करणारे ग्राहक सॅमसंगच्या नवीन वेअरेबल्सवर जवळपास १८,००० रूपयांच्या मल्टी-बाय ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच ७ हे क्रीडा आणि फिटनेसप्रेमींसाठी डिझाइन करण्यात आले आहे. एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो. सॅमसंगच्या नवीन बायोअॅक्टिव्ह सेन्सरचा वापर करत त्यांच्या कार्डियोव्हॅस्कुलर आरोग्याबाबत जाणून घेण्यास देखील मदत करते. यात ऑन-डिमांड ईसीजी रेकॉर्डिंग आणि एचआर अलर्ट फंक्शन मिळते, जे अॅब्नॉर्मली उच्च किंवा कमी हार्ट रेट्सचे आकडा दाखवतो. सॅमसंगने नुकतेच गॅलॅक्सी वॉचेससाठी सॅमसंग हेल्थ मॉनिटर अॅपवर इररेग्युलर हार्ट रिदम नोटिफिकेशन फीचर्स लॉन्च केले आहे.
गॅलॅक्सी बड्स३ प्रो उच्च दर्जाची हाय-फाय साऊंड क्वॉलिटीसह येतात. गॅलॅक्सी बड्स३ प्रो मध्ये सुधारित २-वे स्पीकर्ससह अत्याधुनिक, अचूक उच्च रेंजमधील साऊंड निर्मितीसाठी प्लॅनर ट्विटर आणि ड्युअल अॅम्प्लिफायर्स देण्यात आले आहेत. गॅलॅक्सी बड्स३ स्मार्टफोन्सशी कनेक्ट केल्यानंतर रिअल-टाइम भाषांतर ऐकण्याची सुविधा मिळते. गॅलॅक्सी बड्स३ प्रो मध्ये अॅडप्टिव्ह ईक्यू आणि अॅडप्टिव्ह एएनसी फिचर्स देण्यात आली आहेत.