मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business successor : अब्जाधीश बर्नार्ड आरनाॅल्ट उत्तराधिकाऱ्यांच्या शोधात, ५ मुलांची घेतली आँडिशन

Business successor : अब्जाधीश बर्नार्ड आरनाॅल्ट उत्तराधिकाऱ्यांच्या शोधात, ५ मुलांची घेतली आँडिशन

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 25, 2023 12:52 PM IST

Business successor : संपत्तीच्या बाबतीत जगातील अनेक दिग्गजांना मागे टाकणारे लुई व्हिटॉन या लक्झरी ब्रँडचे मालक फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट आपल्या व्यवसायाची सूत्रे हाती देण्यासाठी उत्तराधिकाऱ्याच्या शोधत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या ५ मुलांची चक्क परीक्षाच घेतली.

bernard arnault HT
bernard arnault HT

Business successor : राजेशाही काळापासूनच उत्तराधिकारी निवडण्याची प्रथा आहे आणि आजही अनेक बड्या उद्योग क्षेत्रातील नामांकित घराण्यांमध्ये ही परंपरा कायम आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी आपल्या व्यवसायाचे साम्राज्य ताब्यात देण्यासाठी स्वतःच्या ५ मुलांची ऑडिशन घेतली.

आजच्या जमान्यात प्रत्येक वडील आपल्या मुलांमध्ये समान वाटणी करुन मोकळे होतात. पण बर्नार्ड अनाॅल्ट यात वेगळे ठरले आहेत. त्यांनी उभे केलेल्या साम्राज्यासाठी चांगला, चाणाक्ष वारस शोधण्याच्या प्रयत्नात ते दिसत आहेत.

लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉन (LVMH) चे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी कंपनीच्या मुख्यालयात दुपारच्या जेवणाच्या वेळी आपल्या मुलांना भेटले आणि व्यवसायाच्या धोरणावर त्यांचा सल्ला घेतला. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीटने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट दर महिन्याला कंपनीच्या मुख्यालयात आपल्या मुलांना भेटायला जातात.

दुपारच्या जेवणाच्यावेळी झाली बैठक

बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी दुपारच्या जेवणाच्या वेळी ९० मिनिटे आपल्या मुलांसोबत वेळ घालवला. या दरम्यान या फ्रेंच अब्जाधीशाने व्यवसाय चालवण्याच्या रणनीतीवर मुलांकडून सल्ला मागितला. ७४ वर्षीय अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट आपल्या पाच मुलांकडे गेले आणि त्यांचा सल्ला घेतला. एलव्हीएमएचमध्ये बदलाची हीच वेळ असल्याचे सुतोवाच केले जात आहे.

एवढ्या मोठ्या लक्झरी बिझनेस एम्पायरचे व्यवस्थापन यशस्वीपणे कोण करू शकते हे पाहण्यासाठी बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी त्यांच्या मुलांचे ऑडिशन घेतल्याचे या अहवालात म्हटले जात आहे. मात्र, त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

उत्तराधिकाऱ्याकडे गुणवत्ता महत्त्वाची

प्रत्येक वडील आपला व्यवसाय आणि मालमत्तेतील हिस्सा मुलांमध्ये समान वाटतात. तथापि, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट, त्याचे लक्झरी साम्राज्य एलव्हीएमएच चालवण्यासाठी त्याच्या पाच मुलांची ऑडिशन घेत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, 74 वर्षीय अब्जाधीशांच्या त्यांच्या मुलांसोबतच्या मासिक भेटी हा त्यांना कंपनी ताब्यात घेण्यासाठी तयार करण्याच्या पुढील दशकभराच्या योजनेचा एक भाग आहे. गुणवत्तेच्या आधारावर त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाईल, असे बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी म्हटले आहे.

ही कंपनी फ्रान्समधील शॅम्पेन व्हाइनयार्डपासून ते इटली आणि टेक्सासमधील हँडबॅग्जपर्यंत सर्व उत्पादने बनवते.एवव्हीएमएच च्या ब्रँड्सच्या पोर्टफोलिओमध्ये लुई व्हिटॉन, बल्गारी, टिफनी, सेफोरा, टॅग ह्युअर आणि डोम पेरिग्नॉन शॅम्पेन यांचा समावेश आहे. सध्या बर्नार्ड अर्नॉल्टची सर्व मुले त्यांच्या वडिलांच्या लक्झरी कंपनीत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग