मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bill gates investment : गायीच्या ढेकरातील गॅसवर उतारा शोधणार हा हटके स्टार्टअप; बिल गेट्सही भारावले!

Bill gates investment : गायीच्या ढेकरातील गॅसवर उतारा शोधणार हा हटके स्टार्टअप; बिल गेट्सही भारावले!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 24, 2023 05:08 PM IST

bill gates investment in Rumin8 : मायक्रोसाॅफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आॅस्ट्रेलियातील एका क्लायमेट टेक्नाॅलाॅजी स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी गायीच्या ढेकरातून निर्माण होणाऱ्या आणि पर्यावरणाला हानीकारक असलेल्या मिथेनची मात्रा घटवण्यासाठी काम करणार आहे.

Bill gates_HT
Bill gates_HT

bill gates investment in Rumin8 : मायक्रोसाॅफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आॅस्ट्रेलियातील एका क्लायमेट टेक्नाॅलाॅजी स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी गायीच्या ढेकरातून निर्माण होणाऱ्या आणि पर्यावरणाला हानीकारक असलेल्या मिथेनची मात्रा घटवण्यासाठी काम करणार आहे. बिल गेट्स मांस उत्पादनासाठी पर्यावरणीय परिणामाबद्दल नेहमी बोलत असतात. कार्बन डाय आॅक्साईड नंतर मिथेन हे सर्वसामान्य ग्रीन हाऊस गॅस आहे.

कंपनीच्या खास सप्लिमेंटमुळे मिथेन निर्मिती थांबेल, असा दावा

गाय, बकरी आणि हरिण यांच्यासारख्या चतृष्पाद प्राण्यांच्या गवत खाल्यानंतर त्यांच्या पचन प्रक्रियेतून मिथेन तयार होतो. या फर्मेंटेनशनच्या प्रक्रियेत मिथेन तयार होतो. तो त्यांच्या शरीराबाहेर टाकला जातो. विविध जागतिक विद्यापीठांच्या अभ्यास अहवालात ही बाब समोर आली आहे की, जर गायीला समुद्री शैवाल (सीवीड) खायला घातल्यास त्यांचे मिथेन गॅसचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होते. आॅस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये रुमिन ८ नावाची स्टार्टअप कंपनी एक डाएटरी सप्लिमेंटवर काम करत आहे. जी मिथेन बनण्याची प्रक्रिया रोखते.

या कंपनीला बेजोस, जॅक मा यांचाही पाठिंबा

स्टार्टअप रुमीन ८ या स्टार्टअप कंपनला जेफ बेजोस, जॅक मा या दिग्गजांचाही पाठिंबा आङे. याशिवाय बिल गेट्स यांनीही या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीचे संचालक डेव्हिड मेस्सिना यांच्या मते, जगभरात क्लायमेट इम्पॅक्ट फंडातून आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग