Amazon Offers: अ‍ॅमेझॉनची जबरदस्त ऑफर! अवघ्या ४,९९९ रुपयांत खरेदी करा एलईडी टीव्ही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon Offers: अ‍ॅमेझॉनची जबरदस्त ऑफर! अवघ्या ४,९९९ रुपयांत खरेदी करा एलईडी टीव्ही

Amazon Offers: अ‍ॅमेझॉनची जबरदस्त ऑफर! अवघ्या ४,९९९ रुपयांत खरेदी करा एलईडी टीव्ही

Jan 25, 2025 01:52 PM IST

Biggest Savings With Amazon: नवीन एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अ‍ॅमेझॉनवर २४ इंचाचा टीव्ही ४९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

अ‍ॅमेझॉन ऑफर: अवघ्या ४,९९९ रुपयांत खरेदी करा एलईडी टीव्ही
अ‍ॅमेझॉन ऑफर: अवघ्या ४,९९९ रुपयांत खरेदी करा एलईडी टीव्ही

LED TV Offers: जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन एलईडी टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्यायांबद्दल सांगत आहोत. आमच्या यादीतील टीव्हीची किंमत ८५०० रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये सर्वात स्वस्त एलईडी टीव्ही फक्त ४९९९ रुपयांचा आहे. हे टीव्ही तुम्ही अ‍ॅमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या टीव्हीमध्ये तुम्हाला बेस्ट इन क्लास डिस्प्ले आणि साउंड मिळेल. तसेच हे टीव्ही परवडणाऱ्या किमतीत जबरदस्त फ्रेमलेस डिझाइन देतात. 

व्हीडब्ल्यू ६० सेमी (२४ इंच) प्रीमियम सीरिज एचडी रेडी एलईडी टीव्ही व्हीडब्ल्यू २४ ए (ब्लॅक)

अ‍ॅमेझॉन इंडियावर ४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. उत्तम फ्रेमलेस डिझाइन असलेला हा टीव्ही ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतो. यामध्ये दमदार साउंडसाठी तुम्हाला २० वॅटचे आउटपुट मिळेल. टीव्हीमध्ये कंपनी कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय पोर्ट देत आहे. हा टीव्ही एक वर्षाची वॉरंटीसोबत येतो.

कोडॅक ८० सेमी (३२ इंच) स्पेशल एडिशन सीरिज एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही ३२एसई५००१बीएल (ब्लॅक)

हा टीव्ही अ‍ॅमेझॉनवर ८४९९ रुपयांना उपलब्ध आहे. कोडॅकचा हा टीव्ही फ्रेमलेस डिझाइनसह येतो. यामध्ये तुम्हाला ४०० निट्सच्या ब्राइटनेस लेव्हलचा डिस्प्ले मिळेल. हा टीव्ही ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेजसह सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यात तुम्हाला एमलॉगिक क्वाड कोर चिपसेट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीच्या या एचडी रेडी डिस्प्लेमध्ये ३ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट आहेत.

एसर ८० सेमी (३२ इंच) अ‍ॅडव्हान्सएन सिरीज स्टँडर्ड एलईडी टीव्ही AR32NSV53HDFL (ब्लॅक)

एसरच्या या टीव्हीची किंमत ७,९९९ रुपये आहे. हा टीव्ही प्रीमियम फ्रेमलेस डिझाइनसह येतो. यामध्ये तुम्हाला १३६६ बाय ७६८ पिक्सल रिझोल्यूशनअसलेला एचडी डिस्प्ले मिळेल. दमदार साउंडसाठी कंपनी या टीव्हीमध्ये २४ वॅटच्या हाय-फाय स्पीकर्ससाठी सराउंड साउंड देत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये ३ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट आहेत. या टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ई- कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर सेल सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहक अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करू शकतात. विविध ऑफर्सबाबत जाणून घेण्यासाठी ग्राहक फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Whats_app_banner