Bajaj Pulsar: ऑटो क्षेत्रातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाजची पल्सर ग्राहकांना खूप आवडते. अशा ग्राहकांसाठी कंपनी येत्या मार्च महिन्यात एक दोन नव्हेतर तब्बल सहा नव्या स्पोर्ट्स बाईक बाजारात लॉन्च करणार आहे, याची कंपनीने आधीच घोषणा केली आहे. मार्ट महिन्यात लॉन्च होणाऱ्या स्पोर्ट्स बाईकमध्ये एन १५०, एन १६०, एन २५०, एफ २५० यांचा समावेश असेल. याशिवाय, बजाज एनएस ४०० लॉन्च करणार आहे. याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता बजाज कंपनी देखील त्यांची नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत बजाजच्या १२५ सीसी पोर्टफोलिओचा बाजारात वाटा ३१ टक्क्यांपर्यंत वाढला. अलीकडेच कंपनीने चेतक रेंज अपडेट केली आहे. आता बजाज लवकरच आणखी एक नवीन चेतक मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चेतक अर्बन आणि प्रीमियम व्हेरियंटची सुरुवातीची किंमत अनुक्रमे १.१५ लाख आणि १.३५ लाख रुपये आहे.
दुसरीकडे, ट्रायम्फ स्पीड ४०० आणि स्क्रॅम्बलर ४०० ची विक्री आत्तापर्यंत दर महिन्याला सुमारे १० हजार युनिट्सचे उत्पादन होते, जे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत सुमारे ३० हजार युनिट्सपर्यंत वाढवले जाईल. सध्या भारतातील ४१ शहरांमध्ये बाइक उपलब्ध आहेत.
चेतकची विक्री सातत्याने वाढत आहे. अलीकडच्या काळात चेतकची मागणी वाढली आहे. जवळपास एका वर्षात चेतकचा मार्केट शेअर पाच टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याशिवाय, बजाज नवीन सीएनजी पॉवरवर चालणाऱ्या बाईकवर काम करत आहे, जी पुढील वर्षी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या बाईक कमी किंमतीत बाजारात दाखल झाल्यास इतर स्पर्धक कंपनींना मोठा फटक बसेल.