मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Big relief to taxpayer : करदात्यांसाठी खुशखबर ! रिफंड अँडजेस्टमेंटसाठी आता २१ दिवसांची मुदत

Big relief to taxpayer : करदात्यांसाठी खुशखबर ! रिफंड अँडजेस्टमेंटसाठी आता २१ दिवसांची मुदत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 05, 2022 02:10 PM IST

Big relief to taxpayer : आयकर विभागाने थकित कराच्या बदल्यात रिफंड अँडजेस्ट करण्यासंदर्भात करदात्यांना दिलासा दिला आहे. अशा प्रकरणांमध्ये आता अधिकाऱ्यांना २१ दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. पूर्वी हा कालावधी ३० दिवसांचा होता.

income tax HT
income tax HT

Big relief to taxpayer : आयकर विभागाने थकित कराच्या बदल्यात रिफंड अँडजेस्ट करण्यासंदर्भात करदात्यांना दिलासा दिला आहे. अशा प्रकरणांमद्ये आता अधिकाऱ्यांना २१ दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. पूर्वी हा कालावधी ३० दिवसांचा होता. या निर्णयामुळे कायदेशीर खटले कमी होतील. आयकर खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर करदाता रिफंड अँडजेस्ट करण्यास सहमती दाखवली नाही तर हे प्रकरण तात्काळ सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट्स (सीपीसी) द्वारे असेसिंग अधिकाऱ्याकडे पाठवले जाईल.
 

हे प्रकरण त्यांच्याकडे गेल्यावर सीपीसी अधिकाऱ्याल २१ दिवसाच्या आत यासंदर्भात उत्तर द्यावे लागणार आहे. आयकर अधिनियम कलम २४५ अंतर्गत असेसिंग अधिकारी करदात्याच्या वतीन थकबाती असलेल्या कोणत्याही कर मागणीसाठी रिफंड अँडजेस्ट करु शकतात. यात करदात्याने कर मागणीसंदर्भात अहसमती दर्शवल्यास तो इंटिमेशन नोटीशीला उत्तरही देऊ शकतो.

आयकर खात्याच्या म्हणण्यानुसार, असेसिंग अधिकाऱ्याला ३० दिवसाच्या आत उत्तर देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक प्रकरणात ३० दिवसांच्या आत उत्तर दिले जात नाही. यामुळे रिफंड जारी करण्यास विलंब होतो आणि कायदेशीर कारवाईच्या प्रकरणातही वाढ होते. त्याशिवाय रिफंड देण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त व्याजाचाही बोझा पडतो.

WhatsApp channel

विभाग