मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Patanjali shares fall : अदानींनंतर आता नंबर पतंजलीचा, शेअर्समध्ये निम्म्यापेक्षा अधिक घसरण

Patanjali shares fall : अदानींनंतर आता नंबर पतंजलीचा, शेअर्समध्ये निम्म्यापेक्षा अधिक घसरण

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 06, 2023 03:04 PM IST

Patanjali shares fall : अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीनंतर आता पतंजली शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. पतंजली शेअर्सचे मूल्य निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहे.

Patanjali HT
Patanjali HT

Patanjali shares fall : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बजारातील नकारात्मक संकेतांमुळे इतर अनेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. योगगुरू रामदेव यांच्या पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही गटांगळी होत असून, गेल्या आठवड्यात पतंजली फूड्सच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असून या दरम्यान गुंतवणूकदारांचे आतापर्यंत सुमारे ७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या आठवड्यात शेअरला लोवर सर्किट

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी पतंजली फूड्सच्या शेअरला लोअर सर्किटला लागले आणि शेअर ९०३.३५ रुपयांपर्यंत घसरला. व्यवसायाच्या शेवटी शेअरची किंमत ९०६.८० रुपये झाली. कंपनीचे बाजार भांडवल ३२,८२५.६९ कोटी रुपये आहे. एका आठवड्यापूर्वी २७ जानेवारीला शेअरची किंमत ११०२ रुपयांच्या पातळीवर होती आणि बाजार भांडवल सुमारे ४० हजार कोटी रुपये इतके होते. अशाप्रकारे एका आठवड्यात कंपनीच्या बाजार भांडवलात ७ हजार कोटी रुपयांची घसरण नोंदवली गेली.

नफ्यात तिसऱ्या तिमाहीत १५ टक्क्यांची वाढ

पतंजली फूड्स कंपनीचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत १५ टक्क्यांनी वाढून २६९.१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विक्रीतील वाढीमुळे निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीने अलीकडेच शेअर बाजाराला माहिती दिली की वर्षभरापूर्वी २०२१-२२ च्या याच तिमाहीत तिचा निव्वळ नफा २३४.०७ कोटी रुपये होता.

सक्षम वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक समीर रस्तोगी म्हणाले की, पतंजली फूड्सबाबत गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे. ते म्हणतात, “या शेअरसाठी सध्या सावध राहावे. कारण तिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेचे मुद्दे आहेत. पतंजली फूड्सने एका महिन्यात जवळपास २५ टक्क्यांचे बाजार भांडवल गमावले आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या दृष्टीने हा चांगला शेअर मानणार नाही.'

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग